Monday, July 1, 2024

‘तुझ्याच्याने होणार नाही’, सुंदर पिचाईंना ‘हे’ तीन प्रश्न विचारताच अक्षय कुमारची पत्नी नेटकऱ्यांकडून ट्रोल

हिंदी सिनेसृष्टीत अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या निर्भीड, बेधडक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. सुपरस्टार अक्षय कुमार याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या नावाचाही यात समावेश होतो. बेधडक वक्तव्यासाठी ओळखली जाणारी ट्विंकल यावेळी भलत्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री आणि कादंबरी लेखिका असणाऱ्या ट्विंकलने नुकताच गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने पिचाई यांच्यावर बऱ्याच प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी दोघांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासह अनेक गोष्टींवरही चर्चा केली. यादरम्यान तिने पिचाई यांना तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले. तिची मुलाखत काहींना आवडली, तर काहींनी तिच्यावर टीकास्त्र डागले.

ट्विंकल खन्नाचे प्रश्न
अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत ट्विंकलने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सांताने मला खूपच चांगली ख्रिसमस भेट दिली आहे. आयकॉनिक गुगल सीईओ सुंदर पिचाई यांची मुलाखत घेण्याची संधी आणि त्यांच्याकडून मी 3 गोष्टी शिकले. 1- भारतात जन्म घेण्याचे जागतिक फायदे काय आहेत? 2- ग्राऊंडेड राहणे आणि आपल्या रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करतात? 3- आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ काय आहे? ग्लोबल आयकॉनसोबतची संपूर्ण मुलाखत लवकरच भेटीला येईल. #GoogleForIndia @googleindia.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

या मुलाखतीदरम्यान सुंदर पिचाई यांनी गडद निळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. तसेच, ट्विंकलने पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट आणि निळ्या रंगाच्या वेस्टकोटमध्ये तयार झाली होती.

चाहत्यांनी दिली अशी रिऍक्शन
ट्विंकलच्या या पोस्टवर विविध कमेंट्स आल्या. यामध्ये काहींनी तिचे अभिनंदन केले, तर काहींनी तिला ट्रोल केले. एका नेटकऱ्याने लिहिले की, “शिकण्याची खूप मोठी संधी आहे. मात्र, वास्तवात याचे ऍप्लिकेशन तुझ्या समजण्यापलीकडची आहे. तुझ्याच्याने होणार नाही.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मला माहिती आहे की, आर्टिफिशयल इंटेलिजन्सबद्दल त्यांनी तुला काय म्हटले असेल. हे तुला बिल्कुल समजणार नाही.” आणखी एकाने तिची प्रशंसा करत लिहिले की, “हा खूपच पॉवरफुल क्षण आहे. तेदेखील सर्वोत्तम व्यक्तिमत्त्वासोबत.” काही चाहत्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ट्विंकल खन्नाबाबत थोडक्यात
अभिनेत्रीविषयी बोलायचं झालं, तर ट्विंकलने फार सिनेमात काम केले नाही. ती जेमतेम 17 सिनेमात झळकली. मात्र, कमी सिनेमात काम करूनही तिने चांगली प्रसिद्धी मिळवली. ती शेवटची 2001मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ या सिनेमात झळकली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर गेली. ती अभिनेत्रीव्यतिरिक्त एक लेखिकाही आहे. तिने ‘मिसेस फनीबोन्स’, ‘द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद’ आणि ‘पायजामाज आर फॉरगिविंग’ ही पुस्तके लिहिली आहेत. (twinkle khanna interviews google ceo sundar pichai fans troll actress)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’ चित्रपटाच्या वादामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची मध्येच उडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
तेरा घर चला जाएगा! बिग बॉसच्या घरामध्ये गली बॉयने केला पुन्हा एकदा राडा

हे देखील वाचा