×

गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल, काय म्हणाले निर्माता सुनील दर्शन?

निर्माते आणि दिग्दर्शक सुनील दर्शन (Sunil Darshan) यांनी गुगलचे ग्लोबल हेड सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांच्याविरोधात मुंबईच्या सत्र न्यायालयात एफआयआर दाखल केली आहे. हे प्रकरण त्यांनी केलेली निर्मित आणि दिग्दर्शित ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ या चित्रपटाच्या कॉपीराइटशी संबंधित आहे. जो त्यांच्या परवानगीशिवाय युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.

या मुद्द्यावर माध्यमांशी बोलताना सुनील दर्शन म्हणाले की, “माझा २०१७ मधील ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट मला न विचारता युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून, कॉपीराइट पूर्णपणे माझ्याकडे आहे आणि मी या चित्रपटाचे हक्क कोणालाही विकलेले नाहीत.”

सुनील दर्शन पुढे म्हणाले की, “या चित्रपटाला मिळणाऱ्या हिट्सचा फायदा काही तृतीय व्यक्ती आणि युट्यूबला होत आहे आणि एक निर्माता म्हणून मला त्यातून एक पैसेही मिळत नाही. अशा परिस्थितीत गेले अनेक महिने मी युट्यूबवर पोलिसात काम करत आहे. गुगल विरुद्ध तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करत होतो. पण पोलिसांमार्फत थेट तक्रार नोंदवता न आल्याने मी सेशन्स कोर्टाचा आसरा घेतला. कोर्टाने पोलिसांना कॉपीराइटच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.”

उल्लेखनीय आहे की, सुनील दर्शन यांनी सुंदर पिचाई यांच्या विरोधात गुगल आणि युट्यूबशी संबंधित आणखी ५ अधिका-यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. गौतम आनंद, जो गियर, नम्रता राजकुमार, पवन अग्रवाल आणि चैतन्य प्रभू आणि सर्वांना कॉपीराइट उल्लंघनासाठी बोलावण्यात आले आहे आणि सर्वांना यासंदर्भात जाब विचारला आहे. सुनील दर्शन सांगतात की, ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ याआधीही त्यांनी गुगल आणि युट्यूबविरोधात तक्रार दाखल केली होती आणि सध्या हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे.

सुनील दर्शन सांगतात की, “माझ्या ‘श्री कृष्णा इंटरनॅशनल’ या निर्मिती संस्थेच्या अंतर्गत जवळपास २० चित्रपटांचे कॉपीराइट माझ्याकडे आहेत. अशा परिस्थितीत मी २०११ मध्ये युट्यूब आणि गुगल विरोधात केस दाखल केली. हे प्रकरण २०१९ पर्यंत चालले आणि कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला. पण २०१९ मध्ये, गुगल आणि युट्यूबने या निर्णयानंतर चंदीगड उच्च न्यायालयात अपील केले, जिथे ही जुनी प्रकरण अद्याप प्रलंबित आहे,” असेही त्यांनी सांगितले आहे.

सुनील दर्शन यांनी बॉलिवूडमध्ये सनी देओल आणि अक्षय कुमार यांच्या ‘जानवर’, ‘एक रिश्ता’, ‘अंदाज’, ‘बरसात’, ‘या मैने भी प्यार किया है’, ‘शकालाका बूम बूम’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा :

Latest Post