हैं दम? स्वरा भास्करने चाहत्यांना दिलं ‘हे’ चॅलेंज, पाहा मंडळी तुम्हालाही जमतंय का स्वराचं खास चॅलेंज?


बॉलीवूडची उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी स्वरा भास्कर सध्या खूप चर्चेत आहे. ती तिच्या विधानांमुळे, तिच्या आणि कंगनाच्या ट्विट वॉरमुळे स्वरा सध्या बातम्यांमध्ये आहे. स्वरा नेहमीच तिच्या विधानांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नेहमी ती विविध गोष्टींवर बेधकपणे तिचे मत सोशल मीडियावर मांडत असते. यांमुळे अनेकदा तिला खूप त्रास देखील झाला आहे. मात्र मागे हटेल ती स्वरा भास्कर कशी. स्वरा देखील या ट्रोलर्सना पुरून उरते.

मात्र आज स्वरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. स्वराने आज तिचे विविध अवतारातील अनेक फनी फोटो ट्विट करत लोकांना या फोटोंवर मिम्स तयार करण्याचे आव्हान दिले आहे. या फोटोंमध्ये स्वरा खूपच विचित्र दिसत आहे. आगळे वेगळे हेअर कट, अजीब चेहेरे, खराब मेकअप, चुकीचे घातलेले दागिने आदी ऑड फोटो तिने ट्विट केले आहेत. हे फोटो ट्विट करताना तिने लिहिले की, “या फोटोना क्रिएटिव्ह आणि मजेदार शीर्षक द्या आणि ह्या फोटोंना विनोदी मिम्समध्ये बनवा, ज्यांचे फोटो मिम्स सर्वात विनोदी असतील त्यांचे मिम्स मी रिट्विट करेल.”

स्वराने हे ट्विट तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी केले आहे. त्या वेबसिरीजचे नाव आहे, ‘आपके कमरे मैं कोई रहता है.’ स्वराचे फनी फोटो असलेले ट्विट सध्या खूप वायरल होत असून या ट्विटचे अनेक धमाकेदार मिम्स तयार होत आहे.

‘आपके कमरे में कोई रहता है’ या सिरीजमध्ये सुमीत व्यास, नवीन कस्तूरिया, अमोल पाराशर, आशीष वर्मा असे दमदार कलाकार दिसणार असून, ही सिरीज पाच भागांची असणार आहे. एमएक्स प्लेयरवर ही सिरीज प्रदर्शित झाली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.