×

येणाऱ्या काळात ‘हे’ मराठी चित्रपट देणार हिंदी चित्रपटांना जोरदार टक्कर, बॉलिवूड निर्मात्यांची वाढली चिंता

सध्या मराठी सिनेसृष्टीत एकापेक्षा एक दमदार चित्रपटांची निर्मिती होतााना दिसत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र मराठी सिनेसृष्टीचा डंका पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्ष चित्रपटगृहे बंंद होती. त्यामुळे आता पुन्हा नव्याने प्रेक्षकांंना सिनेमागृहात अनेक चित्रपटांचा थरार पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीत सध्या असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, ज्यांनी थेट बॉलिवूडच्या चित्रपटांना टक्कर देण्याची जोरदार तयारी केली आहे. ज्यामुळे हिंदी चित्रपट जगतातील अनेक दिग्दर्शकांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेजगताचे बदलले रूप सर्वांनाच पाहायला मिळत आहे. अनेक दमदार चित्रपटांच्या घवघवीत यशाने मराठी सिनेजगताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘पावनखिंड’, ‘झिम्मा’, अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांना मिळालेला अभूतपुर्व प्रतिसाद पाहता, आता अनेक हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही मराठी चित्रपटांची धास्ती घेतली आहे. आता येणाऱ्या काळातही अनेक मराठी चित्रपट हिंदी चित्रपटांंना टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.

‘शेर शिवराज’ नंतर ‘चंद्रमुखी’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि त्याचदिवशी म्हणजेच येत्या शुक्रवारी (२९ एप्रिल) बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर ‘हिरोपंती २’ आणि अजय देवगण (AJayDevgan) स्टारर ‘रनवे३४’ हे दोन सिनेमे रिलीझ होत आहेत. त्यामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटांची चांगलीच टक्कर पाहायला मिळणार आहे.

त्यानंतर १३ मे रोजी रणवीर सिंगचा (Ranveer Singh) कॉमेडी जॉनरचा ‘जयेशभाई जोरदार’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाला टक्कर देण्यासाठी मराठीत प्रविण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि प्रसाद ओक (Prasad Oak) स्टारर ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित सिनेमा रिलीझ होणार आहे. या मराठी चित्रपटांचीही आत्तापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

प्रविण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लॉकडाऊनच्या आधीपासूनंच या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील या बिग बजेट सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. २७ मे रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत झळकणार आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपटांची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post