Friday, September 20, 2024
Home टॉलीवूड ‘पुष्पा’ च्या निर्मात्यांनी दिलं चाहत्यांना गिफ्ट! शेयर केला फहाद फासीलचा फर्स्ट लूक…

‘पुष्पा’ च्या निर्मात्यांनी दिलं चाहत्यांना गिफ्ट! शेयर केला फहाद फासीलचा फर्स्ट लूक…

अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित पुष्पा २ यावर्षी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. चित्रपटाची प्रेक्षक आणि चाहते अशा सर्वांनाच प्रतीक्षा आहे. चित्रपटाविषयी अनेक अपडेट्स वेळोवेळी येत राहतात. चित्रपटात अल्लू अर्जुन सोबत रश्मिका मंधना आणि फहाद फासील हेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच अभिनेता फहाद फासीलचा वाढदिवस होऊन गेला आणि यानिमित्ताने निर्मात्यांनी प्रेक्षकांना एक भेट दिली आहे. 

फहाद फासील ने नुकताच त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा केला. फहाद मुख्यतः मल्याळम चित्रपटांत अभिनय करतो. पुष्पा पार्ट वन मध्ये त्याचं पात्र खूप पसंत केलं गेलं होतं. यात त्याने पोलिसाची भूमिका केली होती. पुष्पा पार्ट २ मध्ये देखील तो इन्स्पेक्टर भंवर सिंह ची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

आता निर्मात्यांनी फहादचा चित्रपटातला फर्स्ट लूक शेयर केला आहे. यात फहाद अतिशय रफ आणि टफ अवतारात दिसत आहे. या लूक नंतर चाहते अतिशय उत्साही आणि आनंदित झाले आहेत. या पोस्टर मध्ये फहादच्या हातात बंदूक दिसत आहे. हि पोस्ट करत निर्मात्यांनी फहादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

पुष्पा पार्ट २ यावर्षी डिसेम्बर मध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख यापूर्वी अनेकदा बदलली आहे. याशिवाय चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण देखील बाकी आहे. यता चित्रपटात देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिलं आहे. ६ डिसेम्बर हि या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –   

आजकालचे नायक जंगल तोडतात ! पवन कल्याण यांनी पुष्पा – २ वर साधला निशाणा ?

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा