उर्वशी रौतेलाच्या डान्स व्हिडिओने केली कमाल, दोन दिवसांत व्हिडिओला मिळाले तब्बल ‘एवढे’ हिट्स


बॉलीवूड मधील ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेला. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. परंतु आज बॉलीवूडमध्ये‌ तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती‌ नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. नुकताच तिचा एक एक व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करत आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे तिचे चाहते खूपच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमधील तिचा डान्स बघताना कोणाचीही नजर तिच्यावरून हटणार नाही. या व्हिडिओला आतापर्यंत 1, 756, 936 वेळा पाहिले गेले आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्वशी ब्रिटनी स्पियर्सचे गाणे ‘गिम्मी मोर’ आणि स्विटीच्या ‘टप इन’ गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स व्हिडिओ शेअर करून तिने ब्रिटनी स्पियर आणि स्विटीला टॅग केला आहे. यासोबतच तिने तिच्या चाहत्यांना टप इन गाण्याचे चॅलेंज दिले आहे. तिच्या या व्हिडिओवर तिचे अनेक चाहते आणि अनेक हॉलिवूड कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत.

उर्वशी रौतेलाबाबत ही गोष्ट संपूर्ण इंडस्ट्रीला माहीत आहे की, तिला एक, दोन नव्हे तर 25 पेक्षाही जास्त डान्स फॉर्म येतात.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच जिओवर येणाऱ्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मध्ये ती रणदीप हुड्डा सोबत दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये उर्वशी एका गृहिणीचे पात्र निभावणार आहे. या सोबत ती लवकरच तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.