Thursday, June 13, 2024

उर्फी जावेदचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; ड्रेसची स्टाईल बघून नेटकरी म्हणाले, ‘मी बकरीला…’

सोशल मीडियावर आपले वेग वेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फी तिच्या फॅशन सेन्ससाठी नेहमीच चर्चेत येत असते. उर्फी कधी काय करेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. नेटकरी उर्फीचे कधी कौतुक करताना दिसतात. तर कधी तिला प्रचंड ट्रोल केले जाते. उर्फी सतत ट्रोलरच्या निशाण्यावर असते.

उर्फी (Urfi Javed) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. उर्फीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.उर्फीने झाडाच्या फांद्यांपासून ड्रेस बनवला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत.

उर्फी जावेदच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘ती भारताचे नाव खराब करत आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘मी बकरीला उर्फीच्या मागे सोडेन’. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ‘काहीतरी लाज वाटू दे.’ अशा प्रकारे, सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांनी उर्फी जावेदला जोरदार ट्रोल केले आहे. मात्र, उर्फी जावेदच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi Javed (@urf7i)

उर्फी जावेदच्या कामाविषयी बोलायच झाले तर, तिने ‘बडे भैय्या की दुल्हनियां’, ‘दुर्गा’, ‘बेपनाह’ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिच्या या अभिनयापेक्षा ती अशा अतरंगी स्टाईलमुळेच सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर येत असते. अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळेच ती वर्षाचे 335 दिवस चर्चेत असते. तिच्या अफलातून फॅशन सेन्समुळे ती सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. (Urfi Javed’s dress video made from tree branches goes viral)

अधिक वाचा- 
‘तो मला स्मशानात घेऊन जायचा आणि…’,अभिनेत्री नर्गिस फाखरीने केला धक्कादायक खुलासा
‘पुरुषांचं हे भारीपण कधी कोणासमोर येत नाही’, अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत

हे देखील वाचा