Thursday, September 28, 2023

‘तो मला स्मशानात घेऊन जायचा आणि…’,अभिनेत्री नर्गिस फाखरीने केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही. ती एक दशकाहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहे. तिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात एक विषेश स्थान निर्माण केले आहे. नर्गिस फाखरीने 2011 मध्ये इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार‘ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली होती. यानंतर नर्गिस फाखरी ‘मद्रास कॅफे‘, ‘फटा पोस्टर निकला हीरो‘, ‘किक‘ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली.

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri ) सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नर्गिस फाखरी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने एका मुलाखतीदरम्यान एक खळबळजनक खुलासा केला आहे. हे जाणून घेतल्यावर तुमचेही हातपाय थरथरू शकतात.

माध्यमांशी बोलताना नर्गिस फाखरी म्हणाली की, मी मुंबईत नवीन घर घेतले तेव्हा मी खूप आनंद होते. कारण ते घर मी माझ्या मेहनतीच्या जोरावर घेतले होते. पण त्या घरात मला रोज रात्री भयानक स्वप्न पडायची. मला दररोज स्वप्नात एक 6 फूट 5 इंच उंच असलेला पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला भितीदायक माणूस दिसायचा. तो मला स्वप्नात रोज स्मशानात घेऊन जायचा. तो मृतदेह बाहेर काढायचा आणि त्याचे मांस खात असे आणि मलाही ते खाण्यास सांगायचा, असे स्वप्न मला सारखे पडात असायचे.

नर्गिस फाखरी पुढे बोलताना म्हणाली की, “या घटनेनंतर मी माझ्या टीमला या बद्दल सर्व माहिती सांगितली. तेव्हा मी मुंबई सोडून दिल्लीला रहायला गेले. पण माझ सामान त्याच घरात राहीले होते. ते सामान आणण्यासाठी माझी टीम तिथे गेली होती. त्यावेळी तिथे त्यांना 6 मृत पक्षी दिसले, असे त्यांनी मला सांगितले. त्या घरात काय सुरू होते याची कल्पना देखील नव्हती.” या घटनेची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (Actress Nargis Fakhri shares her shocking experience with a house in Mumbai)

अधिक वाचा- 
‘पुरुषांचं हे भारीपण कधी कोणासमोर येत नाही’, अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत
रिलवरून ट्रोल करू पाहणाऱ्या नेटकाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांचे सणसणीत उत्तर, कमेंट करत म्हणाल्या, “कोणी विचारलाय सल्ला?…”

हे देखील वाचा