Thursday, September 28, 2023

उर्फी जावेदने बनवला शूजपासून ड्रेस; संतप्त यूजर्स म्हणाले; ‘बेशरम…’

बिग बॉस ओटीटी’च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपन्ना’, ‘भैया की दुल्हनिया’ आणि ‘मेरी दुर्गा’ या सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहे. अभिनयापेक्षाही उर्फी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत येते. तिची बोल्ड स्टाईल चाहत्यांच लक्ष वेधूव घेते. ती दररोज नवनवीन ड्रेसिंग सेन्सने लोकांना आश्चर्यचकित करते.

अशा परिस्थितीत अभिनेत्री उर्फी (Uorfi Javed) पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. कपड्यांमुळे उर्फीला लोक प्रचंड ट्रोल करतात. पण उर्फी त्याच्या विचार कधीही करत नाही. ती बिंधास्त वेगवेगळे कपडे परिधान करत असते. उर्फीने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये उर्फीने चक्क शूजपासून ड्रेस बनवला आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले आहे. यावेळी उर्फीने शूजचा ड्रेस बनवला आहे. काही दिवसांपूर्वी तिला ट्रोल केले गेले होते. लोक तुला चपलेने मारतील असे म्हटले होते. त्या ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिले आहे. व्हिडिओमध्ये दिसते की अभिनेत्रीला एक ऑनलाइन डिलिव्हरी मिळते, ज्यामधून काळ्या आणि पांढर्‍या रंगाचे शूज आले आहेत.

उर्फीला ते शूज दिसतात आणि त्यातून ड्रेस बनवण्याची कल्पना येते. त्यानंतर दुसऱ्याच क्षणी ही अभिनेत्री चपलापासून बनवलेला ड्रेस परिधान करताना दिसत आहे. अभिनेत्री उर्फीतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उर्फीची क्रिएटिव्हिटी पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi Javed (@urf7i)

व्हिडिओ शेअर करताना उर्फीने लिहिले की,”कोई जूता से ना मारे उर्फी को.” तिच्या या पोस्टवर नेटकरांनी खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत. उर्फीच्या या पोस्टवर कमेंट करताना यूजरने लिहिले की ,”तुम्ही कधीच सुधारणार नाही.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बेशरम” तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. (Uorfi Javed made a dress from shoes, the video went viral on social media)

अधिक वाचा- 
– सुयश टिळकची पत्नी ‘या’ हिंदी मालिकेत करणार एण्ट्री; आयुषी म्हणाली…
काळ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील जान्हवीचा हटके लूक व्हायरल

हे देखील वाचा