माधुरी दीक्षित’पासून ते ‘नेहा कक्कर’पर्यंत अनेक कलाकारांनी ‘अशाप्रकारे’ साजरा केला ‘व्हॅलेंटाईन डे’, पाहा त्यांच्या पोस्ट


देशात सर्वत्र प्रेमी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना दिसत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत आहे. त्याचबरोबर, चित्रपटातील कलाकार आपल्या जोडीदारासह प्रेमाचा हा दिवस एका विशेष पद्धतीने साजरा करताना, तसेच चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या शुभेच्छा देताना दिसले. बर्‍याच कलाकारांनी आपल्या जोडीदाराचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुंदर अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर पती श्रीराम नेनेसोबत स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोत श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहेत. या फोटोतून अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री बिपाशा बासू हिनेही ‘व्हॅलेंटाईन डे’ खास पद्धतीने साजरा केला आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पती करणसिंग ग्रोव्हरसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर एकमेकांना किस करताना आणि नंतर ‘व्हॅलेंटाईन डे’साठी केक कापताना दिसले आहेत. या व्हिडिओसह बिपाशा बासूने एक खास पोस्टही लिहिली आहे. पोस्टमध्ये, तिने तिच्या पती आणि चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसरीकडे अभिनेत्री ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करनेही पती रोहनप्रीत सिंगसोबत फोटो शेअर करत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या खास प्रसंगी रोहनप्रीत सिंगने त्याच्या हातावर नेहाच्या नावाचा टॅटू काढला आहे.

याशिवाय बॉलिवूडच्या इतरही अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आपली खास पोस्ट्स शेअर केली आहे आणि त्यांच्या पार्टनरला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व स्टार्सच्या पोस्ट्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.