Sunday, August 9, 2026
Home कॅलेंडर खरंच की काय? वरूण धवन कियाराला मध्यरात्री करायचा फोन!! स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा

खरंच की काय? वरूण धवन कियाराला मध्यरात्री करायचा फोन!! स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा

सन २०१४ साली ‘फगली’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी. कियाराने खूप कमी वेळात अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटातून काम करत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. पहिल्या चित्रपटाच्या अपयशानंतर खचून न जाता कियाराने महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिक सिनेमात भूमिका निभावली. कियाराने ‘एमएस धोनी: द अनटॉल्ड स्टोरी’ या चित्रपटात ‘साक्षी’ ही धोनीच्या पत्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांसह समीक्षकांनाही तिची दखल घ्यायला भाग पाडले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. खूप कमी वेळात तिने बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांसोबत आणि दिग्दर्शकांसोबत काम केले. कियारा नुकतीच ‘लक्ष्मी आणि इंदू की जवानी’ या चित्रपटांमध्ये दिसली होती.

आता कियारा लवकरच वरूण धवन सोबत ‘जुग जुग जियो’ या रोमँटिक सिनेमातून लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. त्या निमित्ताने कियाराने माध्यमांशी संवाद साधला. कियाराने यावेळी सांगितले की, ‘वरूण मला नोट्स एक्‍सचेंज करण्यासाठी मध्यरात्री फोन करायचा. कारण शूटिंगच्या वेळेस सीन्स परफेक्ट व्हावे आणि रिटेक होऊ नये. नोट्स एक्‍सचेंज करण्यासाठी तो मला रात्री फोन करायचा. कामाबद्दल त्याचे समर्पण पाहून मला खरंच वरूणचे खूप कौतुक वाटले.’

कियाराने पुढे सांगितले की, ‘ अनिल कपूर यांच्याबद्दल तर काय बोलावे, त्यांचा उत्साह तर वरूण धवन सारखाच आहे. या वयातही ते अगदी मनापासून आणि अचूक काम करतात. ही मंडळी पेपरवर एनर्जी मिळवतात आणि स्क्रीनवर मल्टिप्लाय करू शकतात. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला अशा कलाकारांसोबाबत काम करायची संधी मिळत आहे.’

‘जुग जुग जियो’ चित्रपटातला सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. चित्रपटाचे शूटिंग चालू झाल्या झाल्या लगेच वरूण धवन आणि नितु सिंग यांना कोरोनाची लागण झाली. आता ही दोघे कोरोनमुक्त झाली असून चित्रपटाची शूटिंग करत आहे.

‘जुग जुग जियो’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शन ‘गुडन्यूज’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले राज मेहताच करत असून, करण जोहर चित्रपटाची निर्मिती करत आहे. या सिनेमात कियारा सोबत वरूण धवन, अनिल कपूर आणि नितु सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कियारा ”जुग जुग जियो’ सिनेमासोबतच सिद्धार्थ मल्होत्रा सोबत शेरशहा, कार्तिक आर्यन सोबत भूल भुलैया २ मध्ये दिसणार आहे.

हे देखील वाचा