Tuesday, September 17, 2024
Home बॉलीवूड शाही आयुष्य जगायची बॉलिवूडची ‘ही’ खलनायिका, बनली होती Rolls Royce खरेदी करणारी पहिली अभिनेत्री

शाही आयुष्य जगायची बॉलिवूडची ‘ही’ खलनायिका, बनली होती Rolls Royce खरेदी करणारी पहिली अभिनेत्री

‘मुड मुड के ना देख’ हे गाणं माहिती नसलेला कदाचित एकही व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही. हे गाणे 1955 साली रिलीज झालेल्या राज कपूर यांच्या ‘श्री 420’ सिनेमातील आहे. या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे नादिरा होय. नादिरा यांनी 50 ते 70च्या दशकात आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ घातली होती. त्यांना बॉलिवूडची पहिली ‘व्हँप’ म्हणून ओळख मिळाली होती. सुरुवातीले नादिरांनी सकारात्मक भूमिका साकारल्या, पण नंतर त्या हिंदी सिनेमातील पहिल्या खलनायिका बनल्या.

काय होतं खरं नाव?
अभिनेत्रीचे खरे नाव नादिरा (Nadira) हे नव्हते. त्यांचे खरे नाव फ्लोरेन्स एजिकल होते. त्यांनी कमी वयात हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यानंतर हळूहळू त्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली. मात्र, एका सिनेमाने त्यांना खलनायिकेच्या रूपात हिंदी सिनेमात प्रस्थापित केले. तो सिनेमा इतर कोणता नाही, तर राज कपूर यांचा ‘श्री 420’ हा होता. या सिनेमातील ‘मुड मुड के ना देख’ हे गाणे खूपच हिट झाले होते. या गाण्यातील नादिरा यांचा अंदाज सर्वांना आवडला होता. यातूनच त्यांना एक व्हँप म्हणून ओळख मिळाली. मात्र, या सिनेमाने त्यांचे असे नुकसान झाले की, यानंतर त्यांना लीड रोल मिळणे बंद झाले होते.

रोल्स रॉयस खरेदी करणारी पहिली अभिनेत्री
नादिरा त्यांच्या काळातील खूपच प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. नादिरा यांना सुरुवातीला 1200 रुपये पगार मिळायचा. त्यानंतर त्यांच्या पगारात वाढ होऊन 2500 रुपये पगार झाला. काळानुसार, त्यांच्या कारकीर्दीचा आलेख वाढतच गेला आणि त्यांना 3600 रुपये पगार मिळू लागला. एकदा तर त्यांची आई इतके रुपये पाहून हैराण झाली होती. त्यांच्या आईने नादिरांना म्हटले होते की, हे सर्व रुपये त्या चोरून तर आणले नाहीत ना. इतका चांगला पगार भेटायचा, तर त्या खूपच शाही अंदाजात आयुष्य जगायच्या. विशेष म्हणजे, त्या बॉलिवूडमधील अशा पहिल्या अभिनेत्री होत्या, ज्यांनी सर्वप्रथम रोल्स रॉयस ही जगातील सर्वात लक्झरी कार खरेदी केली होती.

वाईट झाला शेवट
नादिरा आपले आयुष्य जरी ऐशआरामात जगत असल्या, तरीही त्यांच्या अखेरच्या क्षणी त्या एकट्याच होत्या. त्यांचा शेवट जेव्हा जवळ आला, तेव्हा त्यांच्याजवळ घरकाम करणाऱ्या महिलेशिवाय कोणीही नव्हते. त्यांनी 9 फेब्रुवारी, 2006 रोजी दीर्घ आजाराने जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर त्यात ‘आन’, ‘पाकिझा’, ‘अमर अकबर अँथनी’ आणि ‘जूली’ यांसारख्या सिनेमांचा समावेश होता. (veteran actress nadira was the first actress who own rolls royce)

महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवूडच्या नणंद-भावजयने सोशल मीडियावर पोस्ट करून मागितलं काम, करण जोहरची कमेंट वेधतेय लक्ष
अर्रर्र! सुट्ट्यांवर गेला अन् शरीरासोबत ‘हे’ काय करून बसला ऋतिक? गर्लफ्रेंड म्हणाली, ‘प्लीज तू जास्त…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा