Thursday, September 28, 2023

बॉलिवूडच्या नणंद-भावजयने सोशल मीडियावर पोस्ट करून मागितलं काम, करण जोहरची कमेंट वेधतेय लक्ष

आलिया भट्ट आणि करीना कपूर या दोघी बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त नात्यातील चांगल्या बाँडमुळेही चर्चेत असतात. आलियाने करीनाचा चुलत भाऊ रणबीर कपूर याच्यासोबत संसार थाटला आहे. त्यामुळे नात्याने करीना ही आलियाची नणंद लागते. अशात या दोघींचा समावेश बॉलिवूडमधील नणंद-भावजयांच्या जोड्यांमध्ये होतो. दोघी इंडस्ट्रीत दशकाहून अधिक काळापासून सक्रिय आहेत. मात्र, त्यांनी कधीही एकत्र सिनेमात काम केले नाही. मात्र, आता नणंद-भावजय जोडी एकसोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. त्यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काम मागितले आहे.

आलिया-करीनाची इंस्टाग्राम पोस्ट
‘बेबो’ करीना कपूर (Kareena Kapoor) आणि आता बॉलिवूडची ‘रानी’ बनलेली आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी इंस्टाग्रामवर संयुक्त पोस्ट शेअर केली आहे. या फोटोंवरून स्पष्ट होते की, आलिया आणि करीना (Alia And Kareena) कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टवरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “कुणी आम्हाला एकत्र कोणत्या सिनेमात घेऊ शकतं का? आम्ही आमचा जास्त वेळ बोलण्यातच घालवू शकतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

करण जोहरची कमेंट
जितकं लक्षवेधी या पोस्टचं कॅप्शन आहे, तितकीच लक्षवेधी कमेंट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर (Karan Johar) याने केली आहे. करणने कमेंट करत लिहिले की, “या कास्टसोबत आपल्याला सिनेमा बनवावा लागेल.” याव्यतिरिक्त नेटकरीही या दोघींना एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्सुक झाले आहेत.

आलिया-करीनाचे आगामी सिनेमे
लग्न आणि दोन मुलांची आई बनल्यानंतरही करीना सातत्याने सिनेमात काम करत आहे. तसेच, चाहतेही तिला पसंती दर्शवत आहेत. मागील वर्षी तिचा ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमा रिलीज झाला होता. आता तिच्या ‘द क्रू’ सिनेमाची चर्चा आहे. तसेच, तिच्या ‘वीरे दी वेडिंग 2’ सिनेमाबाबतही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, आलियाविषयी बोलायचं झालं, तर तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ नुकताच रिलीज झाला होता. यानंतर आता ती ‘तख्त’ आणि ‘जी ले जरा’ या सिनेमांमुळे चर्चेत आहे. मात्र, ‘जी ले जरा’ सिनेमा कास्टमुळे पुढे ढकलला जाऊ शकतो. असे म्हटले जात आहे की, प्रियांका चोप्राने नाव मागे घेतले आहे. (actress alia bhatt and kareena kapoor wants to work together share post on social media)

महत्त्वाच्या बातम्या-
अर्रर्र! सुट्ट्यांवर गेला अन् शरीरासोबत ‘हे’ काय करून बसला ऋतिक? गर्लफ्रेंड म्हणाली, ‘प्लीज तू जास्त…’
अखेर ‘Gadar 2’ने 300 कोटींचा आकडा पार केलाच, 8व्या दिवशी सिनेमाने केली तगडी कमाई

हे देखील वाचा