मल्याळम फिल्म इंडस्ट्रीला आज मोठा झटका बसला आहे. दिग्गज मल्याळम अभिनेते जीके पिल्लई यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या त्यांच्या वयानुसार काही आजार झाले होते. मागील काही काळापासून ते याच आजारापासून ग्रस्त होते. जीके पिल्लई हे मल्याळम इंडस्ट्रीमधील मोठे आणि सन्मानित नाव होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या अभिनयाच्या प्रतिभेने त्यांनी मल्याळम चित्रपटांना संपूर्ण जगात ओळख मिळवून दिली. जीके पिल्लई यांनी बहुतकरून खलनायकी भूमिकाच साकारल्या.
जीके पिल्लई हे चित्रपटांमध्ये येण्याआधी १३वर्ष सेनेमध्ये कार्यरत होते. जेव्हा ते भारतीय सेना आणि नौसेनामधून निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी टीव्ही आणि चित्रपटांची वाट धरली आणि एका नव्या क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. जीके पिल्लई हे नाव फक्त खलनायकी भूमिकांसाठीच ओळखले जायचे. त्यांनी जवळपास ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये खलनायक साकारला. सोबतच त्यांनी राज्याच्या पारंपरिक गाण्यावर आधारित नाटकांमध्ये काम केले.
जीके पिल्लई यांचा जन्म तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील वर्कला गावात झाला. त्यांनी १९५४ साली ‘स्नेहसीमा’ (Snehaseema) चित्रपटातून मल्याळम चित्रपटांमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजन यांनी केले होते. जीके पिल्लई हे १९८० च्या दशकात इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त सक्रिय होते. १९९० च्या दशकात ते इंडस्ट्रीमधून गायब झाले. नंतर पुन्हा २००० च्या दशकात ते इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाले. ‘अश्वमेधम’, ‘अरोमालुन्नी’, ‘चोला’, ‘अन्नकलारी’, ‘कार्यस्थान’ हे त्यांचे काही हिट आणि लोकप्रिय सिनेमे आहेत.
जीके पिल्लई हे टीव्ही क्षेत्रातील मोठे कलाकार होते. त्यांनी २००४ साली हॉरर शो ‘कदमतत्थु कथानार’ मधून टीव्ही क्षेत्रात पाऊल टाकले. काही वर्षांपूर्वीच त्यांची पत्नी उलपालक्ष्मी अम्मा यांचे निधन झाले होते. जीके पिल्लई यांच्या निधनावर अनेक राजकीय नेते आणि कलाकार शोक व्यक्त करत दिदिग्ग्ज प्रतिभावान अभिनेता हरपल्याची सांगत आहे.
हेही वाचा-










