Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मराठमोळ्या अभिनेत्याचे बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण, विकी कौशलसोबत साकारतोय ‘ही’ भूमिका

मराठी सिनेसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयासाठी आणि वक्तव्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता अमेय वाघ याने इंडस्ट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘झोंबिवली‘ यााला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच धमाल केली होती. यामध्ये अमेय सोबत मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर हे कलाकार होते. नाटक, वेबसिरिज आणि गाजणाऱ्या चित्रपटाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारा अभिनेता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) लवरकच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने नुकतंच चित्रपटाचं पोस्टर शेअर केले असून त्यावर बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने कमेंट देखिल केली आहे. नुकतंच विकीचा आगामी योणारा चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा‘ मध्ये कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि भूमी पेंडणेकर (Bhumi Pendnekar) मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटचे अजून एक पोस्टर समोर आले आहे ज्यामध्ये अमय वाघ दिसला. अमयन तेच पोस्टर आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यामुळे अमय सध्या दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याने या चित्रपटामध्ये विकीच्या मित्राची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये अमय देखिल झळकला आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत अतून तो वकीलाच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गोविंदाचा वेडा मित्र. ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आम्ही येतोय तुम्हाला भेटायला 16 डिसेंबरला प्लस हॉटस्टारवर.”

 

View this post on Instagram

 

अमयने शेअर केलेल्या पोस्टवर विकी कौशलने कमेंट केली आहे की, “मित्रा तुझ्यासोबत काम करताना मला खूप आनंद मिळाला. भेटूया लवकरच!” अमयच्या शेअर केलेल्या पोस्टवर अनेकजन त्याला शुभेच्छा देत आहेत. त्यामुळे चित्रपट पहाण्यासठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“स्त्री म्हणून माझा स्वाभिमान…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण
‘सब गोलमाल है भाई…ये पप्पू कभी पास नही होगा!’, अभिनेत्री पुजा भट्टचा खुलासा

हे देखील वाचा