पहाटे ३ वाजता ऍडल्ट फिल्म पाहताना पकडला गेला होता अभिनेता; मध्येच आली होती मावशी, पुढे…


‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. त्याचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि हर्षवर्धन राणे देखील दिसणार आहेत. विक्रांतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील त्या घटनेबाबत सांगितले आहे, जेव्हा तो ऍडल्ट चित्रपट बघताना पडकला गेला होता. (Vikrant maasey reveals his embarissing moment while watching adult film)

आरजे सिद्धार्थ कननसोबत बोलताना विक्रांत मेस्सीने सांगितले की, “हे सगळे माझ्या आजीच्या घरी झाले होते. मी आणि माझे भाऊ मिळून ऍडल्ट फिल्म बघत होतो, तेव्हा अचानक तिथे माझी मावशी आली. मला खरंच तेव्हा वाटले नव्हते की, ती सकाळी 3 वाजता उठेल. त्यानंतर आम्ही लाजून तिथून निघून गेलो.”

विक्रांतने पुढे सांगितले की, “काही दिवसांपासून मी माझ्या आजीच्या घरी राहत होतो. या घटनेनंतर जेव्हा केव्हा माझा माझ्या मावशीशी सामना होत असायचा, तेव्हा तिच्या नजरेला नजर मिळवायला देखील मला लाज वाटायची. तो माझ्यासाठी खूप लाजिरवाणा क्षण होता. परंतु तिने याबाबत कधीच माझ्या आईला किंवा इतर कोणाला काहीच सांगितले नाही. कारण तिला समजत होते की, मुलं आता मोठी होत आहेत.”

तापसी पन्नू, विक्रांत मेस्सी आणि हर्षवर्धन राणे यांचा ‘हसीन दिलरुबा’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी (2 जुलै) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच चित्रपटातील गाण्यांना देखील भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.