‘माझा होशील ना’ फेम विराजस कुलकर्णी म्हणतोय, ‘डोळे नेहमी खरं बोलतात’; पाहा हा फोटो


‘माझा होशील ना’ या मालिकेने टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेंच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती. यातील गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. यातील कलाकारांनी देखील अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे.

अभिनेता विराजस कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे फोटो आणि व्हिडिओ तो बऱ्याचदा चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकताच विराजसने त्याचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये बराच पसंत केला जात आहे.

या फोटोत विराजस बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. तसेच तो कॅमेऱ्याकडे बघून पोझ देत आहे. या फोटोसोबतच त्याचे कॅप्शनही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटो शेअर करत विराजस कॅप्शनमध्ये म्हणतोय की, “डोळे, ते कधी खोटं बोलत नाहीत.” फोटोवर लाईक्सचा पाऊस पडताना दिसतोय. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोवर आतापर्यंत ७ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (virajas kulkarni shared photo and said eyes never lie)

विराजस कुलकर्णीबद्दल बोलायचे झाले, तर तो प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. अभिनेत्याशिवाय तो एक लेखक आणि दिग्दर्शकही आहे. त्याने बऱ्याच शॉर्ट फिल्म्सच्या कथा लिहिल्या आहेत. विराजसने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटातून, रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. यानंतर तो स्वप्ना जोशी दिग्दर्शित ‘माधुरी’ व पुढे ‘ती अँड ती’ चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.