Thursday, April 25, 2024

पद्म पुरस्कारांची घोषणा झालीय, मात्र ‘या’ प्रसिद्ध गायिकेने दिला पद्मश्री स्वीकारण्यास नकार; कारण आलं समोर

पद्मश्री किंवा पद्मभूषण हे मानाचे पुरस्कार मानले जातात. एखाद्याच्या कर्तृत्वाचं प्रतिक म्हणून हे पुरस्कार दिले जातात. कोणाला जर हा पुरस्कार मिळाला, तर तो स्वतःला भाग्यवान समजतो. मात्र असेही एक व्यक्तिमत्त्व आहे, ज्याने हा पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

गायिका संध्या मुखर्जी (Sandhya Mukherjee) यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. गायिका संध्या मुखोपाध्याय म्हणून देखील ओळखल्या जातात. या पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता, असेही त्यांनी सांगितले. (veteran singer sandhya mukherjee refuses padma shri award know why)

‘आई पुरस्कार घ्यायला तयार नाही’
गायिकेची मुलगी सौमी सेनगुप्ता म्हणाली की, “मुखर्जींनी दिल्लीहून फोन केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितले की, प्रजासत्ताक दिनाच्या पुरस्काराच्या यादीत पद्मश्री मिळवण्यात मला रस नाही.” मिळालेल्या माहितीनुसार, सेनगुप्ता म्हणाली, “वयाच्या ९०व्या वर्षी पद्मश्रीसाठी गायकाची निवड होणे अत्यंत लाजिरवाणे आहे. पद्मश्री कनिष्ठ कलाकारासाठी (Junior Artist) अधिक योग्य आहे.”

‘या’ पुरस्कारांनी करण्यात आलंय सन्मानित
संध्या मुखर्जी यांना ‘बंग बिभूषण’सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी पद्मश्री हा स्वत:साठी श्रेष्ठ पुरस्कार न मानून स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांनी अनिल विश्वास, मदन मोहन, एसडी बर्मन, रोशन आणि सलील चौधरी यांच्यासह अनेक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

‘या’ व्यक्तिमत्त्वांनीही पुरस्कार घेण्यास दिला नकार
केंद्र सरकारने मंगळवारी (२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. या घोषणेनंतर नवनवे वाद निर्माण होत आहेत. प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांच्या आधी अनिंद्य चटोपाध्याय यांनीही पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. यापूर्वी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी यांनीही पद्मभूषण पुरस्कार न स्वीकारण्याची घोषणा केली होती. पद्मभूषण पुरस्कारासाठी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्जी आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह १७ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा