Brahmastra | ‘रणबीर कपूर नव्हे, तर विराट कोहलीला घेणार होतो’, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने केला खुलासा

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. दोघांनी खुलासा केला नसला, तरी त्यांच्या लग्नाचीही चर्चा जोर धरू लागली आहे. दोघेही पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आलिया आणि रणबीर सध्या त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्याआधी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने चित्रपटात रणबीर कपूर नव्हे, तर विराट कोहलीला (Virat Kohli) घ्यायचं होते असा खळबळजनक खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

इंडियन प्रिमिअर लीगचा (IPL) दिमाखदार उद्घाटन सोहळा रविवारी (२६, मार्च) पार पडला. या उद्घाटन सोहळ्यासाठी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची टीमही उपस्थित होती. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट राईडर्स यांच्यात पार पडला. यावेळी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या टीमने क्रिकेटमधील खेळाडू आणि चित्रपट यांबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात जर क्रिकेटपटूला भूमिका द्यायची झाली, तर कोणाला द्याल?, असा प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना अयान मुखर्जी म्हणाला की, “मी यासाठी विराट कोहलीची निवड करेन. तसेच क्रिकेटबद्दल कोणताही प्रश्न विचारला तर माझे उत्तर विराटच असेल.”

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

यावेळी अभिनेता रणबीर कपूरनेही आपल्या क्रिकेटबद्दलच्या आठवणी सांगताना, “मला महेंद्रसिंग धोनीसोबत खेळायची संधी मिळाली होती याबद्दल मी भाग्यवान समजतो.” अशी प्रतिक्रिया दिली. याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मी महेंद्रसिंग धोनी आणि भारतीय क्रिकेट संघासोबत फूटबॉल खेळाचा आनंद लुटला आहे. ते सगळे खूप चांगले फूटबॉल खेळतात. मला यावेळी खूप काही शिकायला मिळाले.” अशा शब्दात आपला आनंद व्यक्त केला आहे. तर अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंची नावे सांगताना विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी यांचे नाव घेतले. सध्या त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post