×

भारत, दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान विराट आणि अनुष्काच्या मुलीची पाहायला मिळाली छोटी झलक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेट सामने चालू असून सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय सामने सुरु असून, विराट कोहली भारताच्या संघाकडून खेळत आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकाचे फलंदाजी आणि भारताची गोलंदाजी चालू असताना भारताला चांगले यश मिळत होते आणि टीव्हीवर सर्वच लोकं टीम इंडियासाठी चियर करत असताना टीव्हीवर अचानक असे काही दिसले जे पाहून टीव्ही बघणारे सर्वच प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

स्टँड्समध्ये बसून विराटला चियर करणारी अनुष्का आणि तिच्यासोबत वामिकाची छोटीशी झलक या सामन्यादरम्यान सर्वांना दिसली. जेव्हा कॅमेरा फिरला तेव्हा वामिका गुलाबी ड्रेसमध्ये अनुष्काच्या कडेवर दिसली. असे पहिल्यांदा घडले की, विराट आणि अनुष्काच्या मुलीची झलक सर्वांनाच पाहायला मिळाली. तब्बल एक वर्षानंतर वामिकाची छोटी का असेना झलक दिसली. वामिकाचा जन्म झाल्यानंतर विराट आणि अनुष्काने ते त्यांच्या मुलीचा चेहरा जगासमोर आणणार असल्याचे सांगितले होते. या दोघांनी अनेकदा सोशल मीडियावर वामिकाचे अनेक फोटो पोस्ट केले मात्र त्या कोणत्याही फोटोमध्ये तिचा चेहरा दिसला नव्हता. मात्र आता वामिकाचा चेहरा दिसल्यामुळे तिचे फॅन्स खूपच खुश झाले आहेत. भलेही तिचा चेहरा अगदी स्पष्ट दिसला नसला तरी तिचे फॅन्स तिची झलक पाहायला मिळाली यातच खुश झाले.

अनुष्काने दक्षिण आफ्रिका दौर्‍यावेळी वामिकाचे फोटो किंवा व्‍हिडीओ कोणीही घेवू नयेत अशी विनंती अनुष्‍काने सर्व माध्‍यमांना केली होती. त्‍यावेळी सर्वच माध्‍यमांनी टिकजय विनंतीचे पालन देखील केले. यावर अुनष्‍काने सोशल मीडियाच्‍या माध्‍यामतून पत्रकारांचे आभारही मानले होते. आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ सिनेमानंतर अनुष्का चित्रपटात दिसलीच नाही. त्यानंतर तिने पूर्णवेळ तिच्या मुलीला दिला मात्र आता लवकरच अनुष्का ‘चकडा एक्सप्रेस’ सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेही वाचा :

Latest Post