विशालची सौंदर्या कोण?, पोस्ट शेअर करून विशालने लावला प्रेक्षकांच्या अंदाजाला पूर्णविराम


‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम हा घरात असताना मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. घरात असताना त्याची मैत्री, प्रेम, खेळ, स्वभाव हा सगळ्या गोष्टी प्रेक्षकांनी पहिल्या आहेत. घरात असताना त्याची आणि सोनाली पाटील ची मैत्री खूप गाजली होती. परंतु त्यांची मैत्री, मैत्रीच्या पलीकडची होती. परंतु मध्येच त्यांच्या नात्यात कटुता आली आणि त्यांच्यात होती तेवढी मैत्री देखील कमी झाली. यातच त्याने एक मोठ्या खुलासा केला होता. तो खुलासा म्हणजे सौंदर्या. सौंदर्या नावाची त्याची कोणती तरी गर्लफ्रेंड आहे आणि तो तिच्यावर खुप प्रेम करतो असे त्याने टेलिव्हिजनवर सगळ्यांना सांगितले. (Vishal nikam share a post on social media)

 

त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात असे लिहिले आहे की, ” एक नम्र विनंती. मी या पूर्वीच सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ आल्यावर आणि काही खाजगी गोष्टी सुरळीत झाल्यावर स्वतः हून सौंदर्याचे नाव सांगेल. ती एक सामान्य मुलगी असून अभिनयसृष्टिशी तिचा काहीही संबंध नाही. त्यामुळे इंडस्ट्रीमधील कोणत्याही व्यक्तीसोबत माझं नाव जुळवू नका. कारण विनाकारण यामुळे त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. हे लक्षात घ्या आणि प्लीज धीर धरा. मला जरा वेळ द्या.”

त्याच्या या पोस्टने आता सगळ्यांची बोलती बंद झाली आहे. तसेच प्रेक्षकांच्या अंदाजात देखील पूर्णविराम लागला आहे.

हेही वाचा  :


Latest Post

error: Content is protected !!