Saturday, January 28, 2023

कहरच! केवळ पारदर्शक कपडा गुंडाळून प्रियांका चोप्रा आली कॅमेऱ्यासमोर, पाहा फोटो

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आजही ‘देसी गर्ल’च्या रूपाने संपूर्ण देशातील चाहत्यांच्या हृदयात आहे. बऱ्याच दिवसांपासून, ती हिंदी चित्रपटसृष्टीत दिसली नसली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांसोबत राहते. अशातच तिने एक असा एक फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

लाल पारदर्शक कपड्यामध्ये प्रियांका
प्रियांका चोप्राने तिचे काही फोटो शेअर करून इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण या फोटोंमधील पहिल्या फोटोत प्रियांकाची हॉट स्टाईल दिसत आहे. तिने लाल पारदर्शक कापड गुंडाळून फोटोसाठी पोझ दिली आहे. तिचा हा लूक त्याच्या चाहत्यांची झोप उडवण्यासाठी पुरेसा आहे.

‘ब्लॅक ऍंड व्हाईट’ ड्रेसमध्येही दिसतेय कमाल
याशिवाय प्रियांकाने दोन ब्लॅक ऍंड व्हाईट फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “व्हॅनिटी फेअर, फेब्रुवारी २०२२.” आता अभिनेत्रीचे चाहते याला नवीन चित्रपट किंवा सीरिजचे संकेत मानत आहेत.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
हे फोटो पाहिल्यानंतर प्रियांकाचे चाहते तिचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. यावर कोणी फायर इमोजी पोस्ट करत आहेत, तर कोणी हार्ट ईमोजी टाकत आहेत. विशेष म्हणजे, चाहत्यांसोबतच हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा