Friday, May 1, 2026
Home बॉलीवूड नोटबंदीवर आधारित ‘कॅश’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, केव्हा आणि कुठे पाहू शकता सिनेमा?

नोटबंदीवर आधारित ‘कॅश’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, केव्हा आणि कुठे पाहू शकता सिनेमा?

पाच वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीच्या घोषणेने संपूर्ण देशाला धक्का बसला होता. यावेळी लोकांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले. बँका आणि एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता ‘कॅश’ येत आहे, नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर एक विनोदी चित्रपट, जो १९ नोव्हेंबर रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमोल पाराशर, केविन दवे, स्वानंद किरकिरे, स्मृती कालरा आणि गुलशन ग्रोव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. स्मृती या चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

सोमवारी (८ नोव्हेंबर) या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा चित्रपट एका स्वप्नाळू तरुणाची कथा आहे, ज्याला स्वतःची कंपनी सुरू करायची आहे. तो दोनदा नापास झाला आहे, पण सीईओ होण्याचे त्याचे स्वप्न भंगले नाही. अशा परिस्थितीत जेव्हा पंतप्रधान नोटबंदीची घोषणा करतात, तेव्हा त्याला त्यात संधी दिसते आणि तो जुन्या नोटांची विल्हेवाट लावण्याचा धंदा सुरू करतो.

नोटबंदीच्या घोषणेनंतर अमोल पाराशर या व्यक्तिरेखेने लोकांकडे जमा केलेल्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी एक स्टार्टअप सुरू केल्याचे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे, परंतु हे स्टार्टअप सुरू होताच धोक्यात आले आहे. हा चित्रपट रिषभ सेठने दिग्दर्शित केला आहे. पोस्टरमध्येच टॅगलाइन देण्यात आली आहे “नोटबंदीचा स्टार्टअप.”

यापूर्वी ‘सरदार उधम’मध्ये अमोल पराशरला प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्याने सरदार भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. विकी कौशल सरदार उधम सिंग यांच्या भूमिकेत होता. त्याचबरोबर नवोदित स्मृती कालरा हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. स्मृती ‘१२/२४ करोल बाग’, ‘प्यार तूने क्या किया सीझन ५’, ‘दिल संभाल जा जरा’ आणि ‘फियर फॅक्टर खतरों के खिलाडी १०’मध्ये प्रेक्षकांनी पाहिली आहे. याशिवाय स्मृती ‘कप ऑफ टी’, ‘अंबू’ आणि ‘अनलॉक- द स्ट्रेंजर’ या शॉर्ट फिल्म्समध्येही दिसली आहे. शिबानी कश्यपच्या ‘जोगिया’ गाण्याच्या व्हिडिओमध्येही स्मृती मुख्य भूमिकेत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

-कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

हे देखील वाचा