Tuesday, June 6, 2023

डिनरसाठी बोलावून जया रेखाला बोलल्या ‘असं’ काही, ज्यानंतर झालं त्यांचं अमिताभसोबत ब्रेकअप!

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळेच, नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही एकेकाळी चर्चेत राहिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांचे त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखासोबत (Rekha) अफेअर होते. बिग बी आणि रेखा यांच्या अफेअरशी संबंधित अनेक किस्से आजही ऐकले आणि सांगितले जातात. आज आम्ही तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ आणि रेखाच्या कथित अफेअरची बातमी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यापर्यंतही पोहोचली होती. यानंतर जया बच्चन यांनी काय केले, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

बातमीनुसार, अमिताभ एका शूटिंगच्या निमित्ताने शहराबाहेर गेले होते. योग्य संधी पाहून जया यांनी रेखा यांना त्यांच्या घरी जेवणासाठी बोलावले. जयाच्या बाजूने आलेले निमंत्रण पाहून रेखालाही धक्का बसला. अभिनेत्रीला वाटले की, जया नक्कीच त्यांना त्यांच्या घरी बोलावेल आणि बरं वाईट ऐकवतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा घाबरतच जयाच्या घरी पोहोचल्या आणि तिथे त्यांच्या आश्चर्याला थारा उरला नव्हता. (when jaya bachchan called rekha for dinner and this thing about amitabh bachchan)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया डिनरनंतर रेखाला बाहेर सोडण्यासाठी आल्या आणि इथे त्या असे काही बोलल्या जे रेखालाही अपेक्षित नव्हते. खरं तर जया रेखाला म्हणाल्या की, “काहीही झाले तरी मी अमितला सोडणार नाही.” या बातमीवर विश्वास ठेवला, तर रेखा यांना जयाकडून हे ऐकून समजले होते की आता त्यांची आणि अमिताभ यांची वेगळी होण्याची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या घटनेनंतरच दोघांचे ब्रेकअप झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा