‘चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे लोक’, म्हणत सर्वांना खळखळून हसवणाऱ्या भारतीने मांडले तिचे दु:ख


आपल्या मनोरंजन क्षेत्रात अनेक कलाकार त्यांच्या कॉमेडीच्या टायमिंगमुळे ओळखले जातात. असे म्हटले जाते की, लोकांना रडवणे खूप सोपे आहे, हसवणे तितकेच अवघड आहे. हेच लोकांना हसवण्याचे काम काही कलाकार अविरत करत असतात. त्यांच्या विनोदी बुद्धीमुळे हे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत. कॉमेडीच्या दुनियेत पुरुषांना जोरदार टक्कर देणारी कॉमेडियन म्हणजे भारती सिंग.

भारतीने जेव्हापसून या कॉमेडीच्या जगात पाऊल ठेवले, तेव्हापासून ती प्रेक्षकांना सतत हसवतच आली आहे. मात्र, या कलाकारांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे असलेले दुःख ते कधीच जगासमोर आणत नाहीत. भारतीने देखील असेच केले. मात्र, नुकतेच भारतीने तिच्या मनात असलेले सर्व दुःख मनीष पॉलच्या शोमध्ये व्यक्त केले आहे. याशोमध्ये तिने अनेक मोठे आणि धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. करिअरच्या सुरुवातीला जेव्हा शो व्हायचे, तेव्हा भारती तिच्या आईला सोबत घेऊन जायची.

यामागचे कारण सांगताना भारती म्हणाली, “मी माझ्या आईला घेऊनच सर्व कार्यक्रमांना जायचे. अनेक लोकं आईला सांगायचे की, चिंता करू नका आम्ही तुमच्याकडे लक्ष देऊ. मला या सर्व मॉडर्न गोष्टींबद्दल अधिक माहिती नव्हती. कोणी माझ्या कमरेवर हात ठेवला. मला नव्हते माहित की, हे मुलींसाठी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आहे. जे कॉर्डिनेटर्स असायचे ते आम्हाला पैसे द्यायचे, तेच असे कृत्य करायचे. मला ते आवडत नव्हते. मात्र, ते माझ्या काकांसारखे होते. त्यामुळे ते चुकीचे असूच शकत नाही, कदाचित मीच चुकीची असेल असा विचार माझ्या डोक्यात यायचा. त्यावेळी मला माहित नव्हते हे चुकीचे आहे. देवाने प्रत्येक स्त्रीला एक शक्ती दिली आहे. ज्यामुळे तिला पुरुषांच्या स्पर्शामागचा खरा अर्थ समजतो. आज विचार करते, तेव्हा मी स्वतःला मूर्खच समजते की मला हे सर्व समजले नाही.”

पुढे भारती म्हणाली, “त्यावेळी मी माझ्या करियरच्या अगदी पहिलीच टप्प्यात होती, त्यामुळे मला याविरुद्ध बोलायला हिम्मत होत नव्हती. मात्र, आज मी या सर्व गोष्टींविरोधात ठामपणे बोलू शकते. माझ्यात आज हिम्मत आली आहे. आज मी मला स्पर्श केल्यावर त्याला त्याबद्दल विचारू शकते, या विरोधात आवाज उठवू शकते.”

भारतीने आतापर्यंत ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘खतरा खतरा खतरा’, ‘डान्स दीवाने’ यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’

-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’

-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास


Leave A Reply

Your email address will not be published.