Friday, March 29, 2024

रेखा यांनी ऐश्वर्याला लिहिलेल्या पत्रात सांगितले, तिच्या ‘या’ भूमिकेला सर्वात उत्तम

बॉलिवूडमध्ये पाहायला गेलं तर अनेक अभिनेत्री आहेत. काही अभिनेत्रींनी नाव कमावले आहे तर काहींनी एक चित्रपट करूनच इंडस्ट्रीला राम राम ठोकला आहे. पण बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख जेव्हा होता तेव्हा रेखा यांचा यात समावेश असतोच. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत काम करून त्या नावारूपाला आल्या. आजही त्यांचे नितळ सौंदर्य पाहून भल्याभल्या अभिनेत्री त्यांच्यापुढे फिक्या पडतात. अनेक अभिनेत्री त्यांना आदर्श मानतात. त्यांनी अनेकांना मार्गदर्शन देखील केले आहे. यातच ऐश्वर्या राय बच्चन हिचे रेखा यांनी कौतुक केले आहे.

ऐश्वर्या राय हिचा समावेश देखील बॉलिवूडमधील एक सुंदर आणि यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत होतो. त्या दोघींचे देखील खूप चांगले संबंध असून, तिने रेखा यांना तिच्या आईचे स्थान दिले आहे. एवढेच काय तर ती रेखा यांना आई या नावानेच हाक मारते. त्या देखील ऐश्वर्याला आईप्रमाणे जीव लावतात. (When rekha wrote a letter praising Aishwarya Rai told why she is special)

जेव्हा ऐश्वर्याला बॉलिवूडमध्ये येऊन २० वर्ष पूर्ण झाले होते, तेव्हा रेखा यांनी तिच्यासाठी एक पत्र लिहिले होते. जे खूप चर्चेत आले होते. माध्यमातील वृत्तानुसार हे पत्र ऐश्वर्याचा चित्रपट ‘ऐ दिल है मुश्किल’ येण्याआधीच लोकांच्या समोर आले होते. रेखा यांनी या पत्रात ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये २० वर्ष पूर्ण केले म्हणून तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच तिच्यात असणाऱ्या विविध कलागुणांचे कौतुक देखील केले होते. ऐश्वर्याने तिच्या चित्रपटात खूप चांगले काम केले होते यामुळे रेखा खूप प्रभावित झाल्या. म्हणूनच त्यांनी ऐश्वर्याचे खूप कौतुक केले होते.

रेखा यांनी या पत्रात लिहिले होते की, “तुझ्यासारख्या महिला आत्मिक समाधान शोधतात. ज्या नदीप्रमाणे नेहमीच वाहत असतात. जिला कोणीही थांबवू शकत नाही. तिला जिथे जायचे आहे तिथे ती जाते आणि तिच्या ध्येयापर्यंत पोहचते. लोकं तुमचे काम आणि तुमचे बोलणे विसरू शकतात पण तुम्ही त्यांना कसा अनुभव दिलाय हे विसरू शकत नाही.”

रेखा यांनी पुढे लिहिले होते की, “तू खूप साहसी आहेस. तुझ्यातील ऊर्जा तू बोलण्याच्या आधीच तुझ्याबद्दल माहिती देते. तू येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत फिनिक्स पक्षाप्रमाणे खूप पुढे गेली आहेस. तू निभावलेली प्रत्येक भूमिका मला आवडली. परंतु यातील सर्वात आवडते पात्र आराध्याच्या आईचे आहे. असेच प्रेम वाटत राहा आणि तुझी कमाल सर्वांना दाखवत राहा. ऐश्वर्या राय बच्चनने वीस वर्ष पूर्ण केले आहे. तुला खूप प्रेम आणि आशीर्वाद.”

रेखा यांनी ऐश्वर्या रायचे कौतुक करताना आणि तिला आशीर्वाद देताना लिहिलेले हे पत्र खूप व्हायरल झाले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा