बॉलिवूड जग हे आकर्षक अंदाजाने परिपूर्ण आहे. इथे ज्याला टिकायचं असेल, त्याला या आकर्षक दुनियाचा सामना हा करावाच लागतो, हे काही अभिनेत्रींनी दाखवून दिले आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे जॅस्मीन धुन्ना होय. या अभिनेत्रीने कमी काळात खूप नाव कमावले होते. परंतु ती त्या एका घटनेमुळे अचानक गायब झाली. आज याच लेखातून आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
दिग्दर्शक एन. डी. कोठारी यांनी सन १९७९ मध्ये विनोद खन्ना यांच्यासोबत एक चित्रपट बनवला होता. ज्याचे नाव होते, ‘सरकारी मेहमान.’ या चित्रपटात त्यांनी एक नवीन मुलगी जॅस्मीन धुन्नाला ब्रेक दिला होता. हा चित्रपट कधी आला, आणि कधी गेला हे कोणालाही कळले नाही. त्यानंतर जॅस्मीनचा दुसरा चित्रपट ‘तलाक’ प्रदर्शित झाला, ज्यात तिच्याबरोबर शर्मिला टागोर यांनी मुख्य भूमिका साकारली होती, परंतु या दोन्ही चित्रपटांमध्ये तिची सरळ साधी भूमिका असल्याने, जॅस्मीनच्या कारकीर्दीलाही फायदा झाला नव्हता. कारण या दोन्ही चित्रपटांत तिचे साधे पात्र होते. ज्यामुळे कोणीही तिच्याकडे पाहिले नाही.
दोन चित्रपटांनंतर जॅस्मीनला समजले की, चित्रपटांमध्ये आपली छाप पडायची असेल, तर आकर्षक भूमिका या साकारल्याच पाहिजेत. यानंतर जॅस्मीनने रामसे ब्रदर्स यांचा ‘वीराना’ चित्रपट साईन केला होता. जॅस्मीनने आपला ठसा उमटवण्यासाठी, तसेच या चित्रपटासाठी बरेच र्आकर्षक सीन शूट केले होते. मग ते बेडरूमचे सीन असो, किंवा स्नानगृह. जिथे जिथे जॅस्मीनला सांगितले गेले, तिथे तिने न डगमगता आकर्षक सीन दिले होते. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा सर्वत्र धमाल उडाली होती.
बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस सुरू पडला होता. तिचा सुंदर चेहरा, आणि आकर्षक शरीर यामुळे जॅस्मीन धुन्ना सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. इतकेच नाही तर, ‘वीराना’ चित्रपटानंतर जॅस्मीनला, हिंदी सिनेमात सगळ्यात सुंदर भूतनी, ही पदवीही मिळाली होती.
यानंतर, जास्मिनला एकामागून एक अनेक चित्रपट मिळू लागले, आणि ती रातोरात स्टार झाली होती. मग एके दिवशी जॅस्मीनच्या सौंदर्याचे चाहते असलेल्यांनी तिला फोन केला, त्यानंतर ती इतकी घाबरली की, तिने घराबाहेर पडणे बंद केले होते. हा फोन अंडरवर्ल्ड डॉनचा होता, जो त्यावेळी सर्वत्र ओळखला जात होता. डॉन जास्मिनवर इतका वेडा झाला होता की, तो तिला मिळविण्यासाठी, कोणत्याही थराला जाण्यास तयार होता. त्याच्या भीतीमुळे जॅस्मीन रातोरात भारत सोडून अमेरिकेत गेली होती. तेथे जास्मिन लपून छपून जगण्याएवढी असहाय्य झाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-