रविवारी (२ मे) जागतिक हास्य दिवस साजरा केला जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात माणूस हसणं जणू विसरूनच गेला आहे. या धावपळीच्या जीवनात, माणसाच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहेत. आरोग्य उत्तम ठेवायचे असेल, तर आत्ताच्या घडीला हसणे, हा सगळ्यात मोठा व्यायाम आहे. हसण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, जणू हा दिवस साजरा करण्यात येतो असंच म्हणावं लागेल. हा जागतिक हास्य दिवस, मे च्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या विशेष दिवशी, प्रत्येकजण विनोद, मजेदार क्लिप किंवा एकमेकांना किस्से शेअर करत असतात. माणसाने दिवसातला काही वेळ हसण्याला दिलाच पाहिजे, मनापासून खळखळून हसलेच पाहिजे.
या निमित्ताने आम्ही आपल्याला बॉलिवूड चित्रपटांचे, सर्वोत्कृष्ट विनोदी चेहरे दाखवणार आहोत, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य येईल.
ढोल
राजपाल यादव, शरमन जोशी, तुषार शेट्टी, कुणाल खेमू यांचा चित्रपट ‘ढोल’ हा असा मजेदार चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही कितीही वेळा पाहिला, तरीही प्रत्येक वेळी पोट धरून धरून हसाल. चित्रपटात बरेच सीन मजेदार आहेत. आज तुम्ही हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.
बाजीगर
‘बाजीगर’ या चित्रपटाचे मुख्य कलाकार काजोल, शाहरुख आणि शिल्पा शेट्टी आहेत. आजही या चित्रपटात एक सीन असा आहे, जो पाहून तुम्हाला हसू येईल. जॉनी लिव्हर हे या सीनचे संपूर्ण आकर्षण आहे. जॉनी यांच्या कॉमेडीने आजवर प्रत्येक जण, खळखळून हसला आहे. चित्रपटाचा हा सर्वोत्कृष्ट सीन आहे. या सीनमुळेही हा चित्रपट भाव खाऊन गेला, असे म्हणायला हरकत नाही.
दूल्हे राजा
जेव्हा जेव्हा गोविंदा आणि यांची जोडी एकत्र आली, तेव्हा वेगळीच मज्जा प्रेक्षकांना बघायला मिळाली होती. हा सीन ‘दूल्हे राजा’ चित्रपटामधील आहे, ज्यामध्ये दोघांच्या विनोदी क्षणांनी अशी जादू करून दाखवली की, आजही हा सीन बघताना प्रेक्षक हसल्यावाचून राहत नाहीत.
चुपके चुपके
राजपाल यादव असे विनोदी कलाकार आहेत, ज्यांच्या कॉमेडीने त्यांना स्टार बनवले आहे. ‘चुपकेे चुपके’ या चित्रपटात राजपाल यांचे अनेक विनोदी सीन आहेत, ज्यांचा एकत्रितपणे हा मजेदार व्हिडिओ बनविला आहे.
रन
विजय राज यांच्या कॉमेडीची एक वेगळी स्टाईल आहे. ते थोड्या काळासाठी पडद्यावर आले, पण त्यांनी प्रेक्षकांना खूप हसवले. विजय यांचा हा कौवा बिर्याणी सीन सर्वांच्या आवडीचा आहे.
असे काही विनोदी सीन बघून तुम्हीपण तुमचा हास्य दिवस साजरा कराल हे नक्की.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-