अर्रर्र! सलमानच्या ‘राधे’पासून ते अहानच्या ‘तडप’पर्यंत, ‘हे’ चित्रपट २०२१ साली ठरले अपयशी


फक्त दोन आठवड्यांत आपण २०२१ ला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करणार आहोत. कोरोना व्हायरसमुळे लोक जवळपास २ वर्षांपासून मनोरंजनाअभावी जगत आहेत. पण बॉलिवूड चित्रपट नेहमीच तारणहार ठरले आहेत. पण यावर्षी अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांची घोर निराशा केली आहे.

कोरोना विषाणूमुळे दीर्घकाळ चित्रपट गृहे बंद होती. त्याचबरोबर अनेक चित्रपटांचे शूटिंग मागे राहिले होते.यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. यापैकी अनेक चित्रपट सुपरहिट ठरले, तर अनेक चित्रपट फ्लॉप झाले. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या वर्षी प्रदर्शित झालेल्या अशा चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत, ज्यांना प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारले.

राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई
सलमान खान (Salman Khan) याचा चित्रपट ‘राधे’ हा २०२१ मधील सर्वात खराब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला आयएमओबीवर १ रेटिंग मिळाले आहे.

हंगामा २
‘हंगामा २’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण ‘हंगामा २’ प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट कोणालाच आवडला नाही. शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे चित्रपटसृष्टीत पुनरागमन आणि परेश रावलचे (Paresh Rawal) कॉमिक टायमिंगही याला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाही.

तडप
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty) याचे पदार्पण प्रेक्षकांना फारसे भावले नाही. तेलुगू हिट चित्रपटाच्या या हिंदी रिमेकशी प्रेक्षक रिलेट करू शकले नाहीत. या चित्रपटात तारा सुतारियाची (Tara Sutariya) मुख्य भूमिका होती.

बंटी और बबली २
सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि राणी मुखर्जी (Rani Mukherji) यांची जोडी राणी-अभिषेकची जादू पुन्हा निर्माण करण्यात अपयशी ठरली. शर्वरी वाघ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची कामगिरीही कमाल करू शकली नाही.

ट्रेन ऑन द गर्ल

परिणीती चोप्रा हिचे दमदार अभिनय कौशल्य देखील पॉला हॉकिन्स, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’चे हे रुपांतर वाचवू शकले नाही.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!