Memories 2021: मनोरंजनविश्वातील ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी घेतला जगाचा निरोप


आता २०२१ हे वर्ष संपणार आहे. नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वजण २०२२ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा स्थितीत आता पुन्हा एकदा सगळ्यांना घटना आणि भूतकाळातील क्षण आठवत आहेत. कोरोनासोबत गेल्या वर्षभरात अनेक चढ-उतार आले. देशात आणि जगभर अनेक बदल दिसून आले. देश आणि जगाबरोबरच मनोरंजन विश्वातही यंदा बरंच काही पाहायला मिळाले. एकीकडे हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अनेक अर्थाने चांगले ठरले आहे, तर दुसरीकडे हे वर्ष निराशेचेही होते. खरं तर, या वर्षी टीव्ही जगताने अनेक तारे कायमचे गमावले. या वर्षी जगाचा निरोप घेणार्‍या टेलिव्हिजनच्या त्या चमकत्या तार्‍यांबद्दल जाणून घेऊया.

सिद्धार्थ शुक्ला
सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन जगताला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. यावर्षी २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अभिनेत्याच्या तरुण वयात झालेल्या या मृत्यूने सर्वांनाच हादरवून सोडले.

सुरेखा सिक्री
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’मध्ये आजी म्हणून सर्वांच्या मनात स्वत:चे स्थान निर्माण करणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. सुरेखा यांचे यावर्षी जुलैमध्ये निधन झाले. ‘बालिका वधू’ व्यतिरिक्त सुरेखा ‘परदेस में है मेरा दिल’ आणि ‘एक था राजा एक थी रानी’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसल्या. यानंतर त्या शेवटच्या २०२० मध्ये आलेल्या ‘घोस्ट स्टोरीज’ या चित्रपटात दिसल्या होत्या.

Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/Bollywood Khabri

घनश्याम नायक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालचे दुकान सांभाळणाऱ्या नट्टू काकां म्हणजेच घनश्याम नायक (Ghanshyam Nayak) यांच्या जाण्याने चाहत्यांची मने तुटली. खुद्द ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “नट्टू काका दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज देत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे दोन ऑपरेशनही झाले होते. वयामुळे ते रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते. पण ते सुरुवातीपासून आतापर्यंत तारक मेहताच्या टीमचा एक भाग होते.”

Photo Courtesy: Instagram/funny_videos_jethalal

बिक्रमजीत कंवरपाल
अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjit Kanwarpal) यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. बिक्रमजीत कंवरपाल यांनी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर २००३ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ‘पेज ३’, ‘रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर’, ‘आरक्षन, मर्डर २’, ‘२ स्टेट्स’ आणि ‘द गाजी ॲटॅक’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

अनुपम श्याम
स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ मध्ये ठाकूर सज्जन सिंगच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अनुपम श्याम (Anupam Shyam) यांनीही याच वर्षी जगाचा निरोप घेतला. किडनीच्या समस्येने त्रस्त असलेल्या या अभिनेत्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले.

Photo Courtesy: Twitter/nilamadhabpanda

अरविंद त्रिवेदी
रामानंद सागर यांच्या प्रसिद्ध पौराणिक कार्यक्रम ‘रामायण’मध्ये रावणाची सशक्त व्यक्तिरेखा साकारणारे अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांनीही यावर्षी जगाचा घेतला. या अभिनेत्याने ६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

Photo Courtesy: Instagram/dipikachikhliatopiwala

युसूफ हुसेन
प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते युसूफ हुसैन (Yusuf Hussain) यांचे यावर्षी ३० ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांचे जावई हंसल मेहता यांनी याबाबत माहिती दिली होती.

अमित मिस्त्री
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते अमित मिस्त्री (Amit Mistri) यांनीही यावर्षी या जगाचा निरोप घेतला.

वयाच्या ४७ व्या वर्षी अमित यांचा २३ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!