झी मराठी या वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. मालिकेच्या कहाणीत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक आणि वैचारिक दरी दाखवली आहे. तसेच मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या पात्राची प्रेमकहाणी देखील प्रेक्षकांना खूप आवडली. परंतु मधेच या मालिकेत असे दाखवले की, प्रेक्षक या मालिकेचा तिरस्कार करू लागले.
मालिकेत स्वीटू आणि ओमचे लग्न होणार होते. त्यांचे हळद, साखरपुडा, मेहेंदी असे सगळे प्रोग्राम दाखवले. परंतु मधेच मालविका म्हणजेच ओमची बहिण गेम खेळून ऐन लग्नाच्या वेळी ओमला लग्न मंडपातून बाहेर जाण्यास प्रवृत्त करते. त्यामुळे तिला मोहितशी लग्न करावे लागते. या प्रकारामुळे प्रेक्षक या मालिकेवर खूप भडकले होते. लग्नात ज्याच्याशी लग्न ठरले तो नाही आणि दुसराच मुलगा लग्न करतोय. तसेच पूर्ण लग्नात मुलीचा बाप उपस्थित नव्हता हे देखील कोणाच्या कसे लक्षात आले नाही. असे वेगवेगळे प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत होते. तसेच मालिकेचा लेखक काहीही लिहित आहे, असे म्हणत होते. (Yeu kashi tshi mi nandayala malika taking leap of few years)
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे की, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका आता काही वर्षाचा लिप घेणार आहेत. मालिकेची टीआरपी खूप कमी येत आहे तसेच प्रेक्षक देखील चांगला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे मालिकेच्या लेखकांनी मालिकेत लिप घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लिपनंतर ओमचा लूक कसा असणार आहे, याची देखील झलक दाखवली आहे.
त्यामुळे आता येणाऱ्या काळात या मालिकेत काय बदल घडून येणार आहेत? तसेच मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करेल का? स्वीटू आणि ओम एकत्र येतील का? हे बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर
–आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स










