Wednesday, February 19, 2025
Home भोजपूरी पुन्हा एकदा हिट! पॉवरस्टार पवन सिंह-काजल राघवाणीच्या गाण्याला मिळताय लाखो हिट्स

पुन्हा एकदा हिट! पॉवरस्टार पवन सिंह-काजल राघवाणीच्या गाण्याला मिळताय लाखो हिट्स

आजकाल सिनेप्रेमींमध्ये भोजपुरी गाण्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. बॉलिवूडप्रमाणे भोजपुरी गाणीही आता सर्वत्र ऐकायला मिळतात आणि ही गाणी पॉवर स्टार पवन सिंहची असतील तर अजून काही हवं. पवन सिंहची गाणी भोजपुरी गाणी ज्यांना आवडतात त्यांच्यात खूप लोकप्रिय आहेत. जेव्हा भोजपुरी गाण्यांची चर्चा होते तेव्हा पवन सिंह यांच्या ‘छलकत हमरो जवनिया ए राजा’ या सुपरहिट गाण्यावर नाही झाली असं होऊ शकत नाही. या दिवसांत पुन्हा एकदा हे गाणं प्रेक्षकांमध्ये धमाल उडवत आहे.

पवन सिंह आणि काजल राघवानीची जोडी चांगलीच प्रसिद्ध आहे. हे दोघेही भोजपुरी सिनेमाच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत, लोक त्यांची गाणी ऐकल्यानंतर थिरकायला लागतात. अशा परिस्थितीत या दोन्ही सुपरस्टार्सच्या एका सुपरहिट गाण्याने लोकांना पुन्हा वेड लावलं आहे. दोन्ही सुपरस्टार्सचे हे गाणे दुसरे कोणतं नाही तर अनेक विक्रम मोडणारं ‘छलकत हमरो जवनिया ए राजा’ हे आहे.

हे गाणे पुन्हा एकदा लोकांमध्ये व्हायरल होत आहे. काजल राघवानी आणि पवन सिंहची बोल्ड केमिस्ट्री ‘छलकत हमरो जवनिया ए राजा’ मध्ये कमाल दिसत आहे. हे गाणे २०१६ मध्ये यूट्यूबवर अपलोड करण्यात आलं होतं आणि आत्तापर्यंत त्यांना ३५ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याला आतापर्यंत ८ लाखांपेक्षा अधिक लाइक्स देखील मिळाल्या आहेत. लाईक्स आणि व्ह्यूजची ही मालिका अजूनही सुरू आहे.

हे देखील वाचा