‘असा’ व्हि़डिओ शेअर करत, युझवेंद्र चहलची पत्नी देत आहे लैंगिक समानतेचा संदेश; पाहा


भारतीय क्रिकेटर संघाचा स्पिनर युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. धनश्री एक कोरिओग्राफर आहे. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आवडतात. ती सोशल मीडियावर तिचा वेगळा अंदाज चाहत्यांना दाखवत असते. परंतु यावेळी धनश्री वर्मा डान्समुळे नाही, तर क्रिकेट शॉट मारताना दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

धनश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धनश्रीच्या हातात एक बॅट दिसत आहे आणि ती काही शॉट्स खेळत आहे. या शॉटमध्ये ती महेंद्र सिंग धोनीचा (MS Dhoni) हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. यासोबतच तिने स्क्वेयर, स्ट्रेट ड्राइव्ह, हुक शॉट, स्वीप शॉट सहित बाकी अनेक शॉट मारण्याचा प्रयत्न केला आहे. (yuzvendra chahal wife dhanashree verma emulates ms dhoni helicopter shot)

धनश्रीने हा व्हिडिओ शेअर करून लैंगिक समानता दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “हे खेळ आणि स्टॅमिनाबाबत आहे मुलगा आणि मुलीच्या बाबतीतील नाही.” 

धनश्री वर्मा ही सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तिचा नवीन व्हिडिओ ‘प्यार चाहिये’ प्रदर्शित झाला. त्यामुळे ती जोरदार चर्चेत आहे. यातच युझवेंद्र चहल आयपीएल २०२२ मधील आरसीबीवरून अजून परत आला नाही. त्याने आयपीएल २०२१ मध्ये १८ विकेट घेतल्या होत्या. तिचे अनेक डान्स व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील भरपूर असल्याने तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

हेही वाचा : 


Latest Post

error: Content is protected !!