ऋतिक रोशनच्या एक्स पत्नीच्या भावाचे गजब ट्रान्सफॉर्मेशन; त्यानेही मानले सुपरस्टारचे आभार


बॉलिवूड इंडस्ट्रीत आता कलाकारांचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन सामान्य बाब झाली आहे. अनेक कलाकार मागील काही काळापासून आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना इम्प्रेस केले आहे. आता अभिनेता जायद खानचे ट्रान्सफॉर्मेशनही चर्चेत आहे. अभिनेत्याने नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. त्याचे शरीर आधीपासून अधिक बल्की दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून चाहतेही दंग झाले आहेत. (Zayed Khan Body Transformation Fans Actor Hrithik Roshan Sussanne Khan Reacted)

जायदने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काळ्या रंगाची स्पोर्टी लूकमध्ये कॅप घातलेला आपला फोटो शेअर केला आहे. यादरम्यान तो जिममध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने भली मोठी पोस्ट लिहिले आहे. त्याने आपली ही बॉडी शेपमध्ये येण्यासाठी सुपरस्टार ऋतिक रोशनला धन्यवाद दिला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या फोटोवर सुझेन खानने कमेंट करत त्याची प्रशंसा केली आहे.

जायदने पोस्टमार्फत दिली प्रेरणा
अभिनेत्याने पोस्ट शेेअर करत लिहिले की, “सर्वांना सुप्रभात. सूर्य पुन्हा उगवेल. त्यामुळे कधीही उत्साह सोडू नका. मध्येच नाव प्रवास सोडू नका. कधीकधी वेदना असह्य होतात. मलाही हे जाणवले आहे. कधीकधी आपण इतके वेदना सहन करण्यास पात्र देखील नसतो, परंतु आपण ते सहन करावे लागतो. परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, देव अशा लोकांच्या अधिक जवळ आहे. ज्यांना जास्त वेदना होतात आणि एक बलवान आणि निडर व्यक्ती म्हणून बाहेर पडतात. सत्य हे आहे की, आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नेहमीच नसते, परंतु तसे होणे आवश्यक नसते.

ऋतिक रोशनला दिला धन्यवाद
ही वेळ आहे जेव्हा आपण एकमेकांना आणि स्वतःला माफ केले पाहिजे. यावेळी आम्हाला परजीवी नसून योद्धा बनण्याची गरज आहे. मान्य आहे की, गेली दोन वर्षे आपल्यासाठी खूप कठीण आहेत, परंतु आज आपल्या देशाला आपली जितकी आवश्यकता आहे, तितकी याआधी कधीही नव्हती. आपल्याला स्वतःला भरारी घ्यावी लागेल, धूळ बाहेर काढावी लागेल आणि एकत्रितपणे पुढे जावे लागेल. आपल्याला खांद्याला खांदा लावून पुढे जावे लागेल आणि देवावर विश्वास ठेवावा लागेल. आपण स्वतःला संधी देण्याची प्रामाणिकपणे गरज आहे. आपल्याला माहित आहे की, आपण करू शकतो आणि प्रत्येकजण करू शकतो. याबद्दल मी माझे गुरू ऋतिक रोशन यांचे आभार मानतो. प्रगती करत राहा.

६ वर्षांपासून आहे बॉलिवूडपासून दूर
खरं तर जायद खान इंटिरियर डिझायनर सुझेन खानचा भाऊ आणि अभिनेता संजय खान यांचा मुलगा आहे. त्याच्या या फोटोवर सुझेनने कमेंट करत लिहिले की, “खूप छान दिसतोय.”

जायद बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचा भाग राहिला आहे. तो शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’व्यतिरिक्त ‘शब्द’, ‘दस’, ‘स्पीड’, ‘मिशन इस्तांबुल’, ‘युवराज’, ‘ब्लू’, ‘अंजाना- अंजानी’ आणि ‘शराफत’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकला आहे. त्याची बॉलिवडू कारकीर्द फार खास ठरली नाही. मागील ६ वर्षांपासून तो बॉलिवूडपासून दूर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.