‘चड्डी दिसली पाहिजे, नाहीतर लोक चित्रपट का पाहतील’, प्रियांकाने दिग्दर्शकाबाबत केला धक्कादायक खुलासा

Bollywood Actress Priyanka Chopra Recalls How Director Told Her Panties Should Be Seen In Song


प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे ‘मेमोयर अनफिनिश्ड’ हे पुस्तक मंगळवारी (९ फेब्रुवारी) रिलीझ झाले. या पुस्तकात प्रियांकाने आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे पैलू उलगडले आहेत. प्रियांकाचे चाहते बऱ्याच काळापासून या पुस्तकाची वाट पाहत होते, आता त्यांना हे पुस्तक वाचता येईल. प्रियांकाने आपल्या या पुस्तकात बॉलिवूडमध्ये कशाप्रकारे काम मिळते आणि येथील आवडी-निवडी कशा असतात हे सांगितले आहे. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाचा उल्लेख करत प्रियांकाने सांगितले की, तिला एका डायरेक्टरने अशाच प्रकारची मागणी केली होती, त्यामुळे तिने तो चित्रपट सोडला होता.

प्रियांकाने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, “एका चित्रपटासाठी सिडक्टिव्ह गाणे शूट करताना अभिनेत्रीला आपले कपडे काढायचे होते, तेव्हा तिने दिग्दर्शकाला विचारले की, ती आणखी कपडे घालू शकते का? यावर डायरेक्टरने मला प्रत्युत्तर देत म्हटले की, मला आपल्या स्टायलिस्टशी चर्चा करावी लागेल. मी आपल्या स्टायलिस्टशी चर्चा करून फोन डायरेक्टरला दिला, तेव्हा माझ्या समोर डायरेक्टरने म्हटले की काहीही होवो पण चड्डी दिसली पाहिजे. नाही तर लोक चित्रपट पाहायला का जातील?”

प्रियांकाने पुस्तकात लिहिले की, “मी दुसऱ्याच दिवशी तो प्रोजेक्ट सोडून दिला. परंतु डायरेक्टरचे हे म्हणणे पटले नाही. मी दुसरा प्रोजेक्ट शूट करत होते आणि तो दिग्दर्शक त्या सेटवर आला आणि मला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू लागला. माझ्यासोबत काम करणाऱ्या सलमान खानला त्याला समजावण्यासाठी मध्यस्थी करावी लागली.”

‘मिस वर्ल्ड २०००’ बनण्यानंतर प्रियांकाला चित्रपटसृष्टीत अनेक प्रोजेक्ट मिळाले. प्रियांकाने आपल्या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख करत लिहिले की, “जेव्हा मी एका निर्मात्याला (दिग्दर्शक/प्रोड्युसर) भेटले, तेव्हा काही वेळानंतर त्याने मला उभे राहून फिरण्यासाठी सांगितले. मीही तसेच केले. ते माझ्याकडे खूप वेळापर्यंत एकटक नजरेने पाहत राहिले. त्यानंतर त्यांनी मला म्हटले की, मी ब्रेस्ट सर्जरी (स्तन शस्त्रक्रिया) केली पाहिजे.”

“याव्यतिरिक्त आपले जबडे आणि बटचा आकारही ठीक केला पाहिजे. जर मला अभिनेत्री व्हायचे असेल, तर मला हे सर्व ठीक केले पाहिजे. त्यांनी मला म्हटले की, ते लॉस एंजेलिसमधील एका डॉक्टरला ओळखतात, ज्यांच्याकडे ते मला पाठवतील. या घटनेनंतर मला स्वत:मध्ये कमीपणाची जाणीव होऊ लागली होती,” असेही ती पुढे म्हणाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

‘मी अजूनही जुनीच…’, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या तब्बूचे वक्तव्य

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.