वडिलांच्या औषधांसाठी घर गहाण ठेवणारी अभिनेत्री आता झालीय करोडपती, ऑडीसह रहाते कोटींच्या बंगल्यात


बॉलिवूडमधील अभिनेता, अभिनेत्री, गायक आणि डांसर अशा अनेक भूमिकेत काम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी आपल्या आयुष्यात खूप मेहनत घेत एक नाव मिळवले आहे. एकेकाळी त्यांना काम मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागायचे, पण त्यांनी आता एक असे स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही ओळखीची किंवा वणवण भटकण्याची गरज नाही. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण जाणून घेणार आहोत, जिने आपल्या स्वत: च्या हिमतीवर एक स्थान मिळवले आहे.

ती व्यक्ती इतर कोणी नसून हरियाणाची डांसर, गायिका आणि अभिनेत्री सपना चौधरी आहे. तिला आज कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. सपनाने आपल्या मेहनतीने आज जे स्थान मिळवले आहे, ते मिळवणे कोणत्याही व्यक्तीसाठी सोपी गोष्ट नाही. सपनाचे डांस शो पाहण्यासाठी आज लाखो चाहत्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सपना नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते.

 

त्यानंतर आता तिच्या आई बनण्याच्या बातमीमुळे सपना जोरदार चर्चेत आली आहे. सपनाने एका मुलाला जन्म दिला आहे. सपना चौधरीने मॉडेल-अभिनेता वीर साहूसोबत साध्या पद्धतीने जानेवारी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. आज सुपरस्टारचे आयुष्य जगणाऱ्या सपनाला एकेकाळी आपल्या वडिलांच्या औषधांसाठी आपले घरदेखील गहाण ठेवावे लागले होते. ती केवळ ३१०० रुपयांचे डांस शो करायची. परंतु वेळ अशी बदलली की, आज ती खूपच लग्झरी लाईफस्टाईल जगते.

 

सपनाचा जन्म २५ सप्टेंबर, १९९० मध्ये हरियाणाच्या रोहतक येथे झाला होता. ती एक चांगली डांसर आहेच तसेच ती एक चांगली गायिका आणि अभिनेत्रीही आहे. हरियाणवी गाण्यांवर डांस करण्यापासून सुरू झालेला तिचा प्रवास बिग बॉस आणि बॉलिवूडपर्यंत पोहोचला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सपना आज स्टेज शोसाठी जवळपास २ ते ३ लाख रुपये घेते. या हिशोबाने ती एका महिन्यात २२ ते २५ दिवसांच्या कार्यक्रमासाठी करोडो रुपये कमावते. 

सपना चौधरी दिल्लीच्या नजफगडमध्ये करोडो रुपयांच्या बंगल्यात राहते. तिच्या गाड्यांबद्दल बोलायचं झालं, तर तिच्याकडे ऑडी आणि फॉर्च्यूनरसारख्या शानदार गाड्या आहेत. इतकेच नव्हे, तर सपना आपल्यासोबत एक बाऊंसरही ठेवते. एका वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, सपनाकडे जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हेही वाचा-

हरयाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी अडचणीत; करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

सपना चौधरीच्या डान्सवर लोकांनी केली पैशाची उधळण…पहा सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडिओ!

हरयाणवी डान्स क्वीन सपना चौधरीचा नवीन चटक मटक  डान्स व्हायरल, व्हिडिओत सपनाचा जबराट डान्स


Leave A Reply

Your email address will not be published.