हरयाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी अडचणीत; करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप

Delhi Police Field FIR Against Sapna Choudhary In Fraud Case


हरयाणवी गायिका आणि आपल्या डान्स मुव्हने सर्वांचे लक्ष वेधणारी सपना चौधरीच्या अडचणीत वाढ झाली आहे. सपनाविरुद्ध बुधवारी (१० फेब्रुवारी) दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणी आरोप दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे की, तिच्याविरुद्ध जवळपास ४ कोटी रुपयांच्या फसवणूकीची तक्रार नोंदवली आहे. अशामध्ये सपनाला लवकरच दिल्ली पोलिसांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागू शकते. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपनाविरुद्ध दिल्लीच्या ३ आणि हरयाणाच्या २ लोकांनी फसवणूकीचा आरोप केला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, डान्स कार्यक्रमासाठी सपनाने त्यांच्याकडून ४ कोटी रुपये घेतले होते. परंतु तिने कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. या तक्रारीनंतर सपनाविरुद्ध कलम ४२० (फसवणूक), १२० बी (गुन्हेगारी कट) आणि ४०६ (विश्वासघात) या कलमांतर्गत आरोप लावले आहेत. लवकरच सपनाला नोटिस पाठवली जाऊ शकते.

डान्स करून घर चालवायची, आता आहे मोठी स्टार
सपनाचा जन्म २५ सप्टेंबर १९९० रोजी हरयाणाच्या रोहतक जिल्ह्यात झाला होता. असे असले तरीही तिचा सांभाळ दिल्लीमध्ये झाला आहे. सपनाला सुरुवातीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला होता. वाईट काळादरम्यान सपनाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात ऑर्केस्ट्रा कलाकार म्हणून केली होती. यानंतर तिला हळूहळू यश मिळत गेले. घरखर्च भागवण्यासाठी तिने डान्समध्ये आपली कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. स्टेज शो आणि काही चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. आता ती आपल्या कामगिरीमुळे यूपी, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. सपनाने मागील वर्षी २४ जानेवारीला हरयाणवी गायिका, लेखक आणि मॉडेल वीर साहूसोबत लग्न केले होते.

भारतीय जनता पार्टीत झाली आहे सामील
सन २०१९ मध्ये सपना चौधरीच्या काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या अफवा पसरल्या होत्या. काही लोक सदस्य फॉर्म घेऊन आले होते आणि म्हटले होते की, सपना काँग्रेसमध्ये आली आहे. परंतु सपनाने ७ जुलै २०१९ ला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडिअममध्ये विशाल सदस्यता अभिनयानादरम्यान भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाली होती. या कार्यक्रमात शिवराज सिंग चौहान, बीजेपी महासचिव रामलाल आणि बीजेपी प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांचाही समावेश होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ


Leave A Reply

Your email address will not be published.