पवन सिंगच्या गाण्यावर थिरकली अभिनेत्री आम्रपाली दुबे; हिरव्या लेहंग्यात लावतेय चाहत्यांना वेड

dubey dancing on pawan singh holi song bhojpuri south ditish


आम्रपाली दुबे हे भोजपुरी सिनेमातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्यासाठी ती अनेकदा तिचे व्हिडिओ पोस्ट करत राहते. नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती पवन सिंगच्या होळी गाण्यावर जोरदार नाचताना दिसत आहे. या व्हिडिओला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

हिरवा लेहंगा परिधान केलेली आम्रपाली व्हिडिओमध्ये मजेदार पद्धतीने नाचत आहे. ती पवन सिंगच्या ‘लेहंगवा लस लस करता’ या गाण्यावर थिरकत आहे. तिच्या व्हिडिओवर चाहते कमेंट्स करून तिचे कौतुक करत आहेत. “मी तुमच्यावर प्रेम करतो, पण दिनेशला ही गोष्ट सांगू नका” अशी गमतीदार कमेंट एका चाहत्याने केली आहे. त्याच वेळी, एकाने लिहले की, “तुम्ही खूप सुंदर आहात,” तर कोणी तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणत आहे.

अलीकडेच, आम्रपालीचे काही फोटोही व्हायरल झाले होते, ज्यात तिला गुंडांनी वेढले होते आणि तिला वाचवण्यासाठी खेसारीलाल तिथे पोहचतो. वास्तविक, ही संपूर्ण घटना निर्माता प्रदीप शर्मा यांच्या ‘आशिकी’ या नव्या चित्रपटाच्या सेटवरची होती. आजकाल आम्रपाली आणि खेसारीलाल प्रयागराजच्या माघ मेला परिसरात त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. खेसारी यांनी गुंडांना मारहाण करणे आणि आम्रपालीची छेडछाड करणे, हा त्यांच्या चित्रपटाचा एक सीन होता.

खेसारीलाल यादव आणि आम्रपाली दुबे पहिल्यांदा भोजपुरी चित्रपटाचे निर्माता प्रदीप शर्मा यांच्याद्वारे रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची सहनिर्मिती अनिता शर्मा आणि पदम सिंग यांनी केली आहे.

आम्रपाली दुबे हिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर लवकरच तिने टीव्ही मालिकेत आणि नंतर भोजपुरी चित्रपटांमध्ये नाव कमावले. आता आम्रपालीचा लूक खूप बदलला आहे आणि तिची फॅन फॉलोविंगही बरीच वाढली आहे. आज आम्रपाली दुबे ही भोजपुरी सिनेमाची सर्वाधिक मागणी असलेली अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ओये होये होये!’ जस्सी गिलच्या नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; चहलच्या पत्नीनेही लावले ठुमके

-‘अरे कोणीतरी एसी लावा रे’, मलायका आणि नोराचा डान्स पाहून टेरेन्सचे वक्तव्य, तुम्हीही पाहा हॉट व्हिडिओ

-आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.