असे म्हणतात की प्रेमात असताना कोणत्याही प्रकारच्या बंधनाची काळजी नसते. हे आपण बॉलिवूडमध्येही बऱ्याचदा पाहिले आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक नामांकित अभिनेत्री आहेत ज्या विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या आणि नंतर विवाहबंधनात अडकल्या. या यादीमध्ये हेमा मालिनी ते करीना कपूर अश्या अभिनेत्रींची नावे आहेत.
बऱ्याचदा लोक विवाहित लोकांच्या प्रेमात पडतात आणि ही गोष्ट लग्नाच्या बंधनापर्यंत पोहोचते. हे केवळ सामान्य लोकांनीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सनीही असे केले आहे. बॉलिवूडमध्ये अशा बर्याच नामांकित अभिनेत्री आहेत ज्यांचे पूर्व विवाहित पुरुषांवर आपले मन आले आणि त्यानंतर त्यांना लग्नबंधनात अडकवले. चला, अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी विवाहित पुरुषांना आपले जीवनसाथी बनविले.
हेमा मालिनी
‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची प्रेमकथा जवळपास सर्वांनाच माहित आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र आधीच विवाहित आहे हे माहित असूनही, हेमा मालिनी थांबली नाही आणि नंतर दोघांनी लग्न केले. धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे.
श्रीदेवी
बोनी कपूर यांचे श्रीदेवीवर प्रेम होते. नंतर श्रीदेवीसुद्धा त्यांच्या प्रेमात वेडी झाली. 1996 साली त्यांचे लग्न झाले. या नात्यातून त्यांना दोन मुलीही आहेत. मोठी मुलगी जान्हवी कपूर चित्रपटात काम करत आहे. श्रीदेवीपूर्वी बोनीने मोना कपूरसोबत लग्न केले होते.
शबाना आझमी
बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पहिली पत्नी हनी इराणीपासून घटस्फोट घेतल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमीशी लग्न केले. आता ते सुखी आयुष्य जगत आहेत.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टीचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते, परंतु तिने बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले. 2000मध्ये त्यांनी लग्नाची गाठ बांधली. शिल्पाच्या आधी राजने कविता नावाच्या महिलेशी लग्न केले होते. शिल्पाशी लग्न करण्यासाठी त्याने कविताला घटस्फोट दिला.
रवीना टंडन
रवीना टंडनने 2003 मध्ये प्रसिद्ध चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी लग्न केले. अनिलने रवीनाशी लग्न करण्यापूर्वी आपली पहिली पत्नी नताशा सिप्पीशी घटस्फोट घेतला होता.
करीना कपूर
करीना कपूरने सैफ अली खानशी लग्न केले. सैफने पूर्व पत्नी अमृता सिंग हिच्याशी बऱ्याच वर्षांपुर्वी घटस्फोट घेतला होता. करीनाला एक मुलगा तैमूर अली खान असून आता ते दोघे दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत.
राणी मुखर्जी
राणी मुखर्जी ही चित्रपट निर्माता आदित्य चोप्राची दुसरी पत्नी आहे. आदित्यचे पहिले लग्न पायल खन्ना नावाच्या स्त्रीशी झाले होते. आता या जोडप्याला आदिरा नावाची एक मुलगीही आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही वाचा-
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
– द लेजेंड हनुमान सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?
–तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरतंय स्पेलंडर गाणं, रिलीज झाल्यापासून चार दिवसांत मिळालेत लाखो हिट्स
–गुरु रंधावाच्या या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; हिट्स लाखोंच्या घरात