टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यावर नेहाने लावले ठुमके; प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनीही दिल्या प्रतिक्रिया, व्हिडिओला मिळाले लाखो हिट्स


नेहा कक्कर हिने आपल्या गायनाने रसिकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आपल्या गाण्याने तिने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे. नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि बहुतेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहा कक्करने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपला भाऊ टोनी कक्करच्या नुकत्याच आलेल्या ‘बूट शेक’ या गाण्यावर पती रोहनप्रीत सिंगसोबत नाचत आहे.

नेहा कक्करने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे काही तासातच त्याला 1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले. चाहत्यांसह सेलिब्रिटींही नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना दिसले.

काही दिवसांपूर्वीच टोनी कक्करचे ‘बूटी शेक’ हे गाणे रिलीझ झाले आहे. यामध्ये टोनी कक्करसमवेत हंसिका मोटवानी देखील दिसली आहे.

नेहा कक्करच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर नुकतेच तिचे ‘गले लगाना है’ हे गाणे रिलीझ झाले आहे. या गाण्यात निया शर्मा आणि टीव्ही अभिनेता शिविन एकत्र दिसले. नेहाचे हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच गाजले आहे. यापूर्वी नेहाचे ‘ख्याल रखिया कर’ हे गाणे रिलीझ करण्यात आले होते, ज्यात या अभिनेत्रीने मैत्रिणीपासून ते पत्नी आणि आईपर्यंतची भूमिका साकारली होती. या गाण्यात तिच्यासोबत पती रोहनप्रीतही दिसला होता. चाहत्यांनीही त्यांच्या या गाण्याला चांगलीच पसंती दर्शविली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-बॉलिवूडमध्ये आणखी एका सिक्वलची भर! दिशा पटानीने केली ‘या’ सिनेमाची घोषणा, पुढच्यावर्षी होणार प्रदर्शित
-‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेयर करत दिला सर्वांना सुखद धक्का
-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.