‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेयर करत दिला सर्वांना सुखद धक्का


सध्या हिंदी, मराठी मनोरंजन क्षेत्रात सनई चौघड्यांचे सूर वाजत आहेत. एकीकडे अनेक कलाकार लगीनगाठ बांधत असताना दुसरीकडे काही कलाकारांनी त्यांचा साखरपुडा उरकला आहे. अशातच अजून एका अभिनेत्रीने तिचा साखरपुडा झाल्याचे जाहीर केले आहे.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. या मालिकेतील राणादाला मॅटवर कुस्ती शिकवणाऱ्या सखीने म्हणजेच ‘ऋचा आपटे’ हिने तिचा साखरपुडा झाला असल्याचे सोशल मीडिया अकाऊंटवर सांगितले आहे. मात्र, एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिचा हा साखरपुडा मागच्या वर्षी झाला आहे. ऋचाने ही आनंदाची बातमी सांगताच फॅन्स आणि कलाकारांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तिने अचानक केलेल्या या घोषणेमुळे तिच्या फॅन्ससोबतच अनेक कलाकारांना देखील सुखद धक्का बसला आहे. ऋचाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचा एका फोटो पोस्ट करत लिहिले, “आजच्याच दिवशी एक वर्षांपूर्वी.” ऋचाचा होणारा नवरा क्षितीज दाते हा देखील एक अभिनेता आहे.

क्षितीज आणि ऋचाने ‘बन मस्का’ या मालिकेत एकत्र काम केले होते. सुरुवातीला मैत्रीचे असणारे हे नाते नंतर प्रेमात बदलले. क्षितीजने मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात देखील भूमिका साकारली असून त्याची ही भूमिका खूप गाजली होती. तो लवकरच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे, तर ऋचाने ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे. आता या दोघांच्या फॅन्सला त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-नोरा फतेहीच्या ‘या’ गाण्याने लावली इंटरनेटवर आग; एकाच आठवड्यात पार केला ६ कोटी व्ह्यूजचा टप्पा, पाहा व्हिडिओ
-गावाकडच्या पोरानं आपल्या डान्सनं ‘धकधक गर्ल’ला लावले वेड; मग माधुरीनेही केली मोठी घोषणा
-बिग बींना जया बच्चन यांच्यासोबत जायचे होते लंडनला; वडील हरिवंशराय बच्चन यांना समजल्यावर म्हणाले होते, ‘आधी…’
-ए भावड्या जरा इकडं बघ! टोनी कक्करच्या ‘बूटी शेक’ गाण्यात झळकली ‘ही’ अभिनेत्री, व्हिडिओला मिळाले ९० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.