‘ओके कॉम्पुटर’ वेबसीरिजचा ट्रेलर रिलीझ, भविष्यातील जगाची दाखवणार झलक; जॅकी श्रॉफ वेगळ्या भूमिकेत

Ok computer series trailer released, series will release soon


‘ओके कॉम्पुटर’ ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर देखील रिलीझ झाला आहे. याचा ट्रेलर रिलीझ होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सायन्स फिक्शवर बनवलेली ही वेबसीरिज आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित आहे. 26 मार्चला प्रदर्शित होणारी ही सीरिज रोबोट आणि माणसातल्या होणाऱ्या लढाईवर आहे. जॅकी श्रॉफ, राधिका आपटे, विजय वर्मा आणि रसिका दुग्गल हे कलाकार या वेबसीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत. जॅकी श्रॉफ यांनी आतापर्यंत साकारलेली सर्वात वेगळी भूमिका आहे.

या सीरिजची कहाणी या गोष्टीचा खुलासा करत आहे की, मानवाने त्याच्या आयुष्यात कॉम्प्युटरचा वापर किती करावा हे निदर्शनास आणून दिले आहे. सायन्सने नवीन नवीन गोष्टींचा शोध लावला आहे. पण प्रमाणापेक्षा एखाद्या गोष्टीचा वापर केल्यास ती गोष्ट आपल्यासाठी शाप देखील ठरू शकते. या सगळ्या गोष्टी ‘ओके कॉम्पुटर’ या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळतात.

‘ओके कॉम्पुटर’ ही सीरिज सहा भागांमध्ये दाखवली जाणार आहे. या सीरिजचे को-रायटर आणि निर्माता आनंद गांधी यांनी असे म्हटले आहे, “आपलं भविष्य कसं असेल, याची कल्पना ओके कॉम्पुटर या सीरिजमधून पाहायला मिळेल. ही सीरिज या दशकातील सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित करणार आहे की, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जर एखाद्याचा खून झाला, तर त्यासाठी नक्की कोणाला जबाबदार ठरवायचे. या सीरिजमधील एपिक स्टोरीने मनोरंजनासोबत अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी एक वेगळी कहाणी घेऊन येत आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि मला विश्वास आहे की, भारतीय चित्रपटसृष्टीत या विषयावर पुढे जाऊन अनेक सीरिज आणि चित्रपट बनतील.”

या सीरिजमध्ये 2031 हे वर्ष कसं असेल याची झलक दाखवली आहे. या ट्रेलरची सुरुवातीलाच असा आवाज येतो की, भविष्यात तुमचे स्वागत आहे. हा ट्रेलर पाहून एवढंच लक्षात येत आहे की, कार अपघाताने कोणाचा तरी मृत्यू झाला आहे. या एक स्वयंचलित‌ टॅक्सीवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे, तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, जर टॅक्सी कोणीच चालवत नाही तर या हत्येचा गुन्हेगार नक्की कोण??

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून जगाचा निरोप घेण्यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा यांना वाटत होते, राजेश खन्ना यांना मारावी कडकडून मिठी; वाचा ते कारण

-टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री, एका दिवसाचे घेतात जवळपास दीड ते दोन लाख मानधन

-‘बॉम्बे बेगम’ मधून पूजा भट्ट करणार डिजिटल पदार्पण, ‘या’ अभिनेत्रीही साकारणार मुख्य भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.