अस्सल मराठमोळ्या पद्धतीने झालं होतं अजय-काजोलचं लग्न, अशी सुरु झाली होती दोघांची लव्हस्टोरी


‘अजय देवगण’ आणि ‘काजोल’ हे बॉलिवूडमधील अत्यंत रोमँटिक जोडपं आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरूवात देखील खूप इंटरेस्टिंग झाली होती. त्यांच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. एवढे वर्ष होऊनही त्यांच्यातील रोमान्स अजूनही तसाच आहे. चित्रपटाच्या सेटपासून ते लग्नाच्या मंडपापर्यंतचा हा प्रवास खूपच मजेशीर आणि इंटरेस्टिंग आहे. काजोलने अजय सोबतच्या लव्ह स्टोरीचा उल्लेख एका मुलाखतीमध्ये सांगितला होता. तिने सांगितले होते की , तिच्या आणि अजयमध्ये पहिल्याच नजरेत प्रेम झाले होते.

काजोल म्हणाली होती,” अजय देवगण सोबत ‘हलचल’ या चित्रपटात पहिला सीन देताना मला असे जाणवले होते की, हा व्यक्ती आयुष्यभर मला आयुष्यात एक उत्कृष्ट भूमिका निभावणार आहे. मला प्रत्येक प्रसंगात साथ देणार आहे.” त्या वेळेस ते दोघेही रिलेशनमध्ये नव्हते. दोघेही मित्रांसारखे एकमेकांसोबत वेळ घालवत होते. त्यावेळी काजोल आपल्या लव्ह लाईफबद्दल अजयकडून सल्ले घेत असे आणि अजय देखील एखाद्या बाबाप्रमाणे तिला सल्ले देत असे.

काजोल जेव्हा अजयला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा तिला हे समजले की, अजयला समुद्र किनारी बसायला खूप आवडते आणि जास्त बोलायला नाही आवडत. तेव्हा तिने विचार केला की , एखादा व्यक्ती एवढा शांत कसा बसू शकतो. परंतु जेव्हा तिची अजयची ओळख झाली, तेव्हा त्यांच्यातील मैत्री खुलू लागली.

यानंतर त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. इश्क, प्यार तो होना ही था, दिल क्या करे, राजू चाचा, यू मैं ओर हम या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले होते. हळूहळू अजय आणि काजोलमधील प्रेम वाढत गेलं आणि 1999 मध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केले.

त्यानंतर काजोलने असा खुलासा केला की, तिला तिच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये सर्व व्यवस्थित पाहिजे होतं. त्यामुळेच तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काजोल सांगते की,” मला काम करत असल्याचे जवळपास 9 वर्ष झाले होते. प्रत्येक वर्षी मला चार ते पाच चित्रपट मिळायचे. त्यावेळी माझ्याकडे सगळं काही होते. नाव, पैसा इज्जत पण मला स्वतः साठी अजिबात वेळ नव्हता, समाधान नव्हते आणि मला असे वाटले की लग्नाचा योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे.”

त्यावेळी तिने ठरवले की तीला आता लग्न केले पाहिजे. परंतु वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिने फक्त तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे असे तिच्या वडिलांना वाटत होते. परंतु तिच्या या निर्णयात तिची आई तनुजाने तिला खूप पाठिंबा दिला आणि त्यानंतर अजय आणि काजोलचे लग्न झालं.


Leave A Reply

Your email address will not be published.