बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग नेहमीच त्याच्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो. तो त्याचे अतरंगी वस्त्रांमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन नेहमीच सर्वांना हैराण करत असतो. पण आता रणवीर सिंगने जे केलंय त्याने सर्वांना हैराण तर केलंय, पण 440 व्होल्टचा शॉक देखील दिलाय.
.@RanveerOfficial: the Last Bollywood Superstar https://t.co/mMuFPyFP44 pic.twitter.com/eQkD3baj17
— Paper Magazine (@papermagazine) July 21, 2022
रणवीच्या नव्या फोटोंने सध्या सोशल मीडियावर अक्षरशः राडा घातला आहे. रणवीर सिंगचे काही ताजे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. या फोटोत तो आख्खा न्यूड (नग्न) झाल्याचे दिसत आहे. हे फोटो समोर येताच एकच खळबळ उडाली. वास्तविक, रणवीरने एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. अभिनेत्याने एका प्रसिद्ध मासिका पेपर मॅगझिन साठी हे बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये अभिनेता न्यूड होऊन स्टायलिश पोज देताना दिसत आहे. रणवीरच्या या फोटोशूटने सर्वांनाच हैराण केले आहे. ( Actor Ranveer Singh Viral Nude Photoshoot Pics Send On Twitter )
हेही वाचा –
आईच्या ‘अफेअर’ बद्दल लेकीला काय वाटतं? वाचा काय म्हणाली सुष्मिताची मुलगी
एकेवेळी ‘बीग्रेड’ सिनेमात काम करणाऱ्या मान्यताने संजय दत्तबरोबर संसार करून दाखवलाच