बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने अलीकडेच आपल्या जबरदस्त फोटोशूटने आख्खं बॉलिवूड हादरून टाकलं आहे. त्याने न्यूयॉर्कमधील एका मॅगझिनसाठी न्यूड फोटोशूट केले होते, हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रचंड खळबळ माजली. रणवीरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर केल्यानंतर आणि मॅगझिनने केलेल्या ट्वीटनंतर अभिनेत्याचे फोटोशूट व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर चाहते प्रतिक्रिया देत आहेत, पण आता रणवीरच्या या फोटोंवर बॉलिवूड अभिनेत्री आणि त्याची पत्नी दीपिका पदुकोण हिची प्रतिक्रियाही समोर आली आहे.
आता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) न्यूड फोटोशूटवर पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट (Ranveer Singh Nude Photoshoot) पाहून दीपिका पदुकोण चकित झाली होती. जरी लोक तिला ट्रोल करून चर्चा करत असतील, तरी पण दीपिकाला त्याचे हे फोटो खूपच प्रभावी वाटले.
शूटबद्दल सर्व माहिती होती दीपिकाला
माध्यमांनी एका हवाल्यावरून सांगितले की, “या शूटची योजना खूप आधीपासून करण्यात आली होती. रणवीर सिंग या शूटच्या व्हिजनबद्दल अगदी स्पष्ट होता आणि दीपिकाला देखील पहिल्या दिवसापासून या शूटबद्दल सर्व काही माहित होते. ती सुरुवातीपासूनच संपूर्ण शूटमध्ये लूपमध्ये होती आणि तिला ही संकल्पना आवडलीही होती.
View this post on Instagram
व्हायरल होण्यापूर्वी दीपिकाने पाहिले होते फोटो
जेव्हा पूर्णपणे वेगळं काहीतरी करण्याचा विचार आला, तेव्हा रणवीर मागे हटला नाही. दीपिका पदुकोणने हे फोटो इंटरनेटवर येण्यापूर्वीच पाहिले होते. दीपिकाने नेहमीच रणवीर सिंगला पाठिंबा दिला आहे.
रणवीरने न्यूड फोटोंसाठी घेतली खूप मेहनत
रणवीर सिंगला हा प्रोजेक्ट करायचा होता. रणवीर नेहमीच बिनधास्त असतो. अशा परिस्थितीत न्यूड फोटोशूट करणं ही अभिनेत्यासाठी नवीन गोष्ट नव्हती. त्याने आपल्या न्यूड फोटोंसाठीही मेहनत घेतली. रणवीरसाठी ही फार मोठी गोष्ट नव्हती.
View this post on Instagram
मे किंवा जूनमध्ये फोटो होणार होते प्रदर्शित
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फोटो खूप आधी प्रदर्शित होणार होते, परंतु रणवीर सिंगच्या उर्वरित कामांमुळे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे ते पुढे ढकलावे लागले. ते मे किंवा जून महिन्यात प्रदर्शित होणार होते, पण रणवीरला थोडी वाट पाहायची होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आता कोणाचं घर जाळणार?’, म्हणत ढसाढसा रडली प्रसिद्ध अभिनेत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल
दु:खद! क्रिकेट खेळताना प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, पत्नी अन् मुलाला सोडून गेला देवाघरी