‘होळी’ हा भारतातील मोठ्या सणांपैकी एक सण आहे. होळी म्हटल्यावर गाण्यांचा धुमधडाका आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मिळतोच. होळीच्या पार्श्वभूमीवर अनेक गाणी रिलीझ होताना दिसत आहेत. यामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीचे मोठे योगदान आहे. यातील गायक, अभिनेते नवनवीन गाणी घेऊन येत आहेत. अशातच आता भोजपुरी गायक अंकुश राजा आणि शिल्पी राज यांचे होळीवरील गाणे इंटरनेटवर धमाल करताना दिसत आहे.
अंकुश आणि शिल्पीच्या या गाण्याचे नाव ‘जीजे से रंग लगवईले बानी’ असे आहे. अंकुश राजाच्या या भोजपुरी होळी गाण्यात मॉडेल त्रिशा कर मधूही जबरदस्त अंदाजात दिसत आहे. एकीकडे निशाने साडी घातली आहे, तर दुसरीकडे गाण्याच्या अर्ध्या भागानंतर तिचा शॉर्ट्समधील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भलताच भावत आहे.
होळीवरील हे गाणे अंकुशने आपल्या यूट्यूब चॅनेलवर मंगळवारी (२ मार्च) अपलोड केले आहे. या गाण्याला एकाच दिवसात २५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चाहत्यांना हे गाणे खूप आवडले आहे. या गाण्याचे लिरिक्स बोस रामपुरी यांनी लिहिले आहेत, तर गाण्याला आर्या शर्मा यांनी संगीत दिले आहे.
अंकुश राजा आणि शिल्पी राज यांच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन आर्या शर्मा यांनीच केले आहे. विशेष म्हणजे व्ह्यूजव्यतिरिक्त या गाण्याला ६५ हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचसोबत अडीच हजारांपेक्षा अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
अंकुश आणि शिल्पी यांनी ट्रेंडिंग स्टार असेही म्हटले जात आहे. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, ‘गाणे जबरदस्त आहे, व्हिडिओही चांगल्याप्रकारे चित्रीत केला आहे.’ दुसऱ्या एका चाहतीने कमेंट करत लिहिले की, ‘अंकुश माझा आवडता गायक आहे. त्याचे हे गाणेही खूप छान आहे.’
आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘पवन सिंग, रितेश पांडे आणि अंकुश राजा यांची गाणी चांगली असतात. ही गाणी घरामध्येही वाजवू शकता.’
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स
-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग
-बिकीनीत फोटो पाहायचे असेल तर केवळ मौनी रॉयचेच! पाहा मौनीच्या घायाळ करणाऱ्या अदा