Thursday, August 27, 2026
Home हॉलीवूड काळजाला चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध कॉमेडियनचे निधन, ३२ वर्षांच्या वयात गेला देवाघरी

काळजाला चटका लावणारी बातमी! प्रसिद्ध कॉमेडियनचे निधन, ३२ वर्षांच्या वयात गेला देवाघरी

कलाविश्वातून चांगल्या-वाईट बातम्या येतच असतात. काही बातम्यांमुळे पायाखालची जमीन सरकून जाते. आताही असेच काहीसे घडले आहे. हॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन टेडी रे याचे निधन झाले आहे. त्याने वयाच्या ३२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, टेडी रे कॅलिफोर्नियाच्या रँचो मिराजच्या खासगी घरात मृत अवस्थेत आढळला. कॉमेडियनचे खरे नाव थिअडोर ब्राऊनअ असे होते, तर टेडी रे हे त्याचे स्टेज नाव होते. स्थानिक पोलिसांनी याची पुष्टी केली की, टेडीचे निधन शुक्रवारी (दि. १२ ऑगस्ट) सकाळी झाले होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सध्या कॉमेडियन टेडी रे (Teddy Ray) याच्या निधनाचे कारण समजले नाहीये. कॉमेडियन हा त्याच्या अनेक रियॅलिटी शोसाठी ओळखला जात होता. मात्र, त्याला सर्वाधिक प्रसिद्धी ही एचबीओ मॅक्सवरील ‘पॉज विद सेम जे’ या सीरिजसाठी ओळखले जाते. याव्यतिरिक्त तो मागील वर्षी एका कॉमेडी कोर्ट रूम सीरिजच्या एका एपिसोडमध्येही झळकला होता.

त्याने ‘वाइल्ड एन आऊट’, कॉमेडी सेंट्रलच्या कोलोसल क्लस्टरफेस्ट आणि एचबीओच्या ‘ऑल डेफ कॉमेडी’वर स्टँड-अप केले होते. त्याने अनेक ठिकाणी आपले परफॉर्मन्स दिले होते. अगदी अलीकडे तो जून आणि जुलैमध्ये वॉशिंग्टन डीसी आणि लॉस एंजेलिसमधील त्याच्या शोमध्ये दिसला होता.

टेडी रे याच्या निधनाची माहिती मिळताच त्याच्या काही सहकारी कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. टीव्ही नेटवर्क कॉमेडी सेंट्रलने टेडी रे याच्या निधनाबद्दल ट्वीट केले. तो म्हणाला की, “टेडी रे हा एक आनंदी आणि लाडका कलाकार होता, ज्याची संपूर्ण कॉमेडी समुदायाला खूप आठवण येईल.” दुसरीकडे, ऑल डेफ डिजिटल, ज्यांच्यासोबत रे काम करत होता, त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “हार्टब्रोकन. आम्ही त्याला दररोज मिस करू, परंतु आम्हाला माहित आहे की, तो स्वर्गात देखील हसेल.”

कॉमेडियन टेडी रे याच्या आकस्मिक निधनाची बातमी आल्यापासून मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-
अक्षय कुमार बॉयकॉटवर बोललाच; म्हणाला, ‘लोकांच्या खोडसाळपणामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेची…’
प्रियांका चोप्रा ते सुष्मिता सेन, बॉलिवूड गाजवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनी केली आहे देशसेवा
महिलेला फसवल्यामुळे ‘हा’ कलाकार सापडला कायद्याच्या कचाट्यात, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हे देखील वाचा