मनोरंजन विश्वातील सर्वात मोठ्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘ऑस्कर 2023’ साठी जगभरातून चित्रपट आणि कलाकारांची निवड केली जात आहे. यावर्षी भारतातून ‘ऑस्कर‘(Oscar) यासाठी नामांकनासाठी बॉलीवूड किंवा साऊथचा कोणताही चित्रपट नसून गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
‘छेल्लो शो’ असे या गुजराती चित्रपटाचे नाव आहे. ‘छेल्लो शो’ या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर सिनेमा या विभागासाठी भारताकडून निवड करण्यात आली असून अनेक चित्रपट या शर्यतीत असताना ‘ छेल्लो शो’ ‘नं बाजी मारली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या निवड समितीनं ऑस्करसाठी ‘छेल्लो शो’ अधिकृत निवड झाल्याचं जाहीर केलं. ‘छेल्लो शो’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर पान नलिन यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ११० मिनिटांच्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऑस्करसाठी आर आर आर आणि काश्मीर फाइल्स या चित्रपटांची नावं चर्चेत होती. अशा अनेक चित्रपटांना मागं सारत ‘छेल्लो शो’ नं ऑस्करवारीचा पहिला टप्पा पार केला आहे.
⭐ Not #RRR
⭐ Not #TheKashmirFiles…
⭐ #LastFilmShow [#ChhelloShow] is #India's official entry to the #Oscars… OFFICIAL POSTER… pic.twitter.com/uiWUSCAtB3— taran adarsh (@taran_adarsh) September 20, 2022
सेमी ऑटोबायोग्राफी
चित्रपटाचे दिग्दर्शक पान नलिन यांचं आयुष्यही या चित्रपटाशी मिळतं जुळतं असल्याचं म्हटलं जातं. ते स्वत: एका छोट्या गावातील आहेत. तिथून त्यांचं चित्रपट प्रेम आता ऑस्करपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळं चित्रपटाची कथा पान नलिन यांची सेमी ऑटोबायोग्राफी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
छेल्लो शो
छेल्लो शो या गुजराती चित्रपटाची कथा गावातल्या एका मुलाची गोष्ट आहे. ज्याचं चित्रपटांवर प्रेम आहे. हा मुलगा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमा प्रोजेक्टर टेक्नीशियनच्या मदतीनं गुजरातमधील छलाला इथल्या प्रोजेक्शन रुममध्ये पोहोचतो. अनेक चित्रपट तो बघतो. चित्रपट बघता बघता त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं. चित्रपटात सिंगल स्क्रिन चित्रपटांचं जग उत्कृष्टरणे दाखण्यात आलेय.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाला जडला गंभीर आजार? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले
सोनम आणि आनंद आहुजा यांच्या बाळाचं नाव ठरलं; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
ऋचा चड्ढाच्या लग्नाचे दागिने आहेत खूपच खास! जाणून घ्या काय आहे तब्बल 175 वर्ष जुनं कनेक्शन