Thursday, November 30, 2023

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाला जडला गंभीर आजार? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितले

दाक्षिण्यात प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) हिला आरोग्याच्या विशिष्ट समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे कळतेय. ती उपचारासाठी परदेशी रवाना होणार असल्याचेही म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा सोशल मीडियावर सक्रिय नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक घेतल्याचे वृत्त आहे. समंथा काही दिवसांपूर्वीच ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये झळकली होती. त्यानंतर ती फारशी माध्यमांसमोर किंवा चाहत्यांसमोर आली नाही.

समंथा त्वचेशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. या आजाराला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन’ म्हणतात. हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचेवर होतो. यामुळे समंथा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीये. नुकत्याच पार पडलेल्या अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवरही ती झळकली नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून समंथा ‘खुशी’ या चित्रपटाचं शूटिंग करत होती. मात्र आता तिने शूटिंग थांबवलं आहे. या चित्रपटात समंथासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. या शूटिंगचं वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आलं आहे. आजाराच्या उपचारासाठी ती अमेरिकेला जाणार असल्याचं कळतंय.

पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन हा दुर्मिळ आजार आहे. समंथाच्या आधी सलमान खान आणि दिवंगत अभिनेता इरफान खान देखील या आजाराचे बळी ठरले आहेत. सहसा ज्यांना सूर्यप्रकाशात चालण्याची सवय नसते, त्यांना सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात आल्यावर खाज येते. या खाजमुळे त्वचेवर डाग येऊ लागतात. यात काहींना वेदना देखील होतात.

मॅनेजरने फेटाळले वृत्त
समंथाच्या आरोग्याविषयी या विविध चर्चा असतानाच आता तिच्या मॅनेजरने हे वृत्त फेटाळलं आहे. हे सर्व फक्त गॉसिप असल्याचं समंथाचा मॅनेजर महेंद्र याने म्हटलंय. मात्र समंथा अमेरिकेला जाणार असल्याचं वृत्त त्याने फेटाळलं नाही. समंथा अमेरिकेला जाणार हे निश्चित असून तिथे ती कशासाठी जात आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सोनम आणि आनंद आहुजा यांच्या बाळाचं नाव ठरलं; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

ऋचा चड्ढाच्या लग्नाचे दागिने आहेत खूपच खास! जाणून घ्या काय आहे तब्बल 175 वर्ष जुनं कनेक्शन
अनिल कपूरच्या फॉरेन व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा झक्कास फोटो

हे देखील वाचा