Wednesday, September 23, 2026
Home बॉलीवूड ‘मला हे सर्व का मिळाले…’, ट्रोलिंगनंतर नेहा कक्करने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

‘मला हे सर्व का मिळाले…’, ट्रोलिंगनंतर नेहा कक्करने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर(Neha Kakkar)  सध्या चांगलीच वादात सापडलेली पाहायला मिळत आहे. गायिका फाल्गुनी पाठकचे गाणे रिमेक केल्याने तिने हा वाद ओढवून घेतला आहे. . अलीकडेच, दिग्गज गायिका फाल्गुनी पाठकच्या मैने पायल है छनकाई या आयकॉनिक गाण्याचा रिमेक रिलीज केल्यामुळे तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. नेटकऱ्यांसह गायिका फाल्गुनि पाठकनेही तिच्यावर जोरदार निशाणा साधत कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला होता. यावर आता नेहाने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

नेहा कक्करने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात लिहिले आहे, “माझ्याकडे जे काही आहे ते या जगात फार कमी लोकांकडे आहे. तेही इतक्या लहान वयात. प्रकारची प्रसिद्धी, प्रेम, असंख्य सुपरहिट गाणी, सुपर डुपर हिट टीव्ही शो, वर्ल्ड टूर, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील चाहते आणि न जाणो काय!! माझी प्रतिभा, माझी मेहनत, माझी आवड आणि सकारात्मकता यामुळे मला हे सर्व का मिळाले हे तुम्हाला माहीत आहे. आज मला माझ्या देवाचे आभार मानायचे आहेत त्या सर्व लोकांचे ज्यांनी मला इतके प्रेम दिले आहे.”

त्याचबरोबर तीने पुढे, “धन्यवाद!! मी देवाचा सर्वात प्रिय मुलगा आहे..पुन्हा एकदा धन्यवाद! मी तुम्हा सर्वांसाठी आयुष्यभराच्या आनंदासाठी प्रार्थना करतो.” नेहाच्या या पोस्टवर सर्व सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचा पती रोहनप्रीतने लिहिले की, ‘नेहा कक्कर राणी आहे आणि नेहमीच राहील’. भाऊ टोनी कक्करने लिहिले, ‘खरीच देवाची सर्वात गोड मुलगी’. या व्यतिरिक्त टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या, धनश्री वर्मा, गीता फोगट यांच्यासह इतर सेलिब्रिटींनीही या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा- आलियाच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर, जबरदस्त ॲक्शन सीन करताना दिसली अभिनेत्री
प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवरचं केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल
‘जंगलात राघू खूप असतात पण वाघ एकच…’, अमेय वाघची सुमित राघवनला टॅग करत खळबळजनक पोस्ट

हे देखील वाचा